बेळगाव लाईव्ह : राजहंसगड येथे परंपरेनुसार आजतागायत पालखी सोहळा व दसरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, संपूर्ण गावभर पालखीची मिरवणूक काढून गडावरील सिद्धेश्वर मंदिरात पालखी ठेवून नऊ दिवस 30-35 जन दररोज पालखीची पुजा करतात, व सिमोल्लंघन दिवशी दसरा सण साजरा करतात अशी या गावची परंपरा असते.
हा संपूर्ण सोहळा मागील 60-70 वर्षापासून देवस्थान पंच कमिटीच्या अध्यक्षतेखाली पार पाडत असतात, परंतू मागील काही दिवसापासून गडावर एक ग्रामस्थांना विश्वासात न घेता कमिटी तयार करण्यात आली आहे. त्या कमिटीकडून राजहंसगडावर पालखी नेण्याचा प्रयत्न काही जणांनी केल्याने गावात रविवारी (दि. १५) काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाला होता त्यामुळे गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून घटस्थापनेसह सणच साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बेळगाव ग्रामीणचे सहायक पोलिस आयुक्त एस. व्ही. गिरीश यांच्यासह राजकीय नेत्यांनी घटनास्थळी जाऊन समजूत काढल्याने गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. परंतु, पालखी नेमकी कुठे बसवायची, याबाबत रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नव्हता.
गेल्या ६० वर्षांपासून परंपरेनुसार राजहंसगड ग्रामस्थांच्या वतीने देवस्की पंच कमिटीच्या अध्यक्षतेखाली पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. गावात मिरवणूक काढून गडावरील सिद्धेश्वर मंदिरात ९ दिवस पूजा- अर्चा केली जाते. दररोज ३० तरुण पूजा करतात.विजयादशमीला सीमोल्लंघन करून सोहळा दसरोत्सव साजरा केला जातो. हा सोहळा देवस्थान पंच कमिटीच्या अध्यक्षेखाली साजरा केला जातो. मात्र, आयोजन केले जाते. गावात मिरवणूक काढून गडावरील सिद्धेश्वर मंदिरात ९ दिवस पूजा अर्चा केली जाते. दररोज ३० तरुण पूजा करतात.
काही दिवसांपासून राजहंस किल्ला विकास समितीच्या काही सदस्यानी पंच कमिटी आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता धार्मिक कार्यामध्ये अडथळे आणण्याचे काम सुरु केले आहे. श्रावण महिन्यात किल्ल्यावरील विकासकामांबाबत विघ्न निर्माण झाल्याने यंदा पालखी सोहळा आणि दसरोत्सव गावातच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पालखी नेण्याचा प्रयत्न पंच कमिटीच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी गावात दसरोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेला असताना काही जणांनी गावकऱ्यांच्या विरोधात जात रविवारी राजहंसगडावर पालखी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत बैठक बोलावून संबंधितांना जाब विचारला. बाहेरुन आलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गावकऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी राजहंसगडाकडे तसेच गावात धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. बेळगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलिस आयुक्त एस. व्ही. गरीश, भाजप नेते धनजंय जाधव यानी संतप्त गावकऱ्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र तणावाचे वातावरण कायम असल्याने गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी यांच्यासह त्यांचे सहकारी बंदोबस्त
ठेवून आहेत. उशिरापर्यंत निर्णय नाही गडावर पालखी नेऊन बसवायची की गावातच, याबाबत रात्री उशिरापर्यंत दोन गटांमध्ये चर्चा सुरू होती. पोलिस व काही राजकीय नेतेही निर्णय घेण्यासाठी मध्यस्थी करत होते. रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा निघाला नव्हता. ज्यांनी गावात धक्काबुक्की केली त्यांच्यावर आधी तक्रार मग व पढचे बोल. असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
६० वर्षांची परंपरा खंडित-राजहंसगड गावकऱ्यांच्या वतीने गेल्या सुमारे ६० वर्षांपासून दसरोत्सवानिमित्त गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात पालखी पूजन केले जात होते. मात्र, यंदा काहींनी अचानक घुसखोरी करत वर्षांनुवर्षे चालत आलेली परपंरा खंडित केली, असा आरोप गावकऱ्यांनी केला. या प्रकारामुळे गावात असंतोष आहे.