Sunday, January 26, 2025

/

डी के शिवकुमार सतीश जारकीहोळी यांच्यात संघर्ष आहे का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येऊन पाच महिने उलटले असले तरी मागील वेळेप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात म्हणावा तेवढा राजकीय संघर्ष दिसला नव्हता.मात्र राज्यात सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणा सध्या सरकार स्थापनेच्या पाच महिन्यांनी संघर्ष सुरू होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

याचे कारणही तसेच आहे बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्यात मोलाची भूमिका बजावणारे असे नेते ज्यांचे वर्चस्व जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व आहे ते सतीश जारकीहोळी आणि के पी सी सी अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्यात संघर्ष आहे दोघात शिवकुमार यांच्या बेळगाव येथील वाढत्या हस्तक्षेपावर जारकीहोळी नाराज असल्याचे बोलले जात आहे.

बुधवारी डी के शिवकुमार यांनी बेळगाव दौरा केला खरा मात्र त्यांच्या या बेळगाव भेटी दरम्यान त्यांच्याकडे बेळगाव जिल्ह्यातील स्थानिक आमदारांनी पाठ फिरवली होती. नेमके याच मुद्द्यावरून शिवकुमार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला मात्र त्यांनी तो टाळला आणि सतीश जारकीहोळी आणि आपल्यात कोणतेच गैरसमज नसल्याचे सांगितले.इतकेच काय तर सतीश हे बंगळुरुत असल्याने आणि लक्ष्मी हेब्बाळकर या बेळगावात नाहीत त्यामुळे भेटायला आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.Dk

 belgaum

जरी डी के शिवकुमार यांनी सतीश जारकीहोळी यांच्यासोबत कोल्ड वार सुरू नसल्याचे म्हटले असले तरी कर्नाटकाच्या राजकीय जाणकार अनुसार या दोघात सध्या संघर्ष सुरू आहे. बेळगाव जिल्ह्याची सूत्रे आणि पालकमंत्री पद सतीश यांच्याकडे असले तरी अधिकाऱ्यांच्या बदलीत झालेला वाढता हस्तक्षेप आणि भाजपा सोडून काँग्रेसमध्ये आलेले अथणीचे माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांना सतीशयांच्याकडे असलेले केपीसीसीचा कार्याध्यक्ष पद देण्याबाबत चाललेल्या हालचाली यावरून सतीश नाराज आहेत आणि त्यामुळेच ते वीस आमदारांना एकत्र करून म्हैसूरच्या दसऱ्यात सहभागी होणार होते आपल्या समर्थकांची शक्ती दाखवणार होते मात्र हाय कमांडकडून ऐनवेळी त्यांची नाराजी दूर करण्यात आल्याने सध्या हे राजकीय संघर्ष शमल्या सारखा वाटत असल्याचेही जाणकार सांगतात.

Dasra advt
बुधवारी उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर बेळगाव शहर किंवा जिल्ह्यातील एकही आमदार नव्हता किंबहुना स्वागतासाठी विमानतळावर गेला नाही यावरूनच अंदाज लावला जात असून जिल्ह्याच्या राजकारणात काहीतरी सुरू आहे उपमुख्यमंत्री जर बेळगावात असतील तर स्थानिक आमदारांनी त्यांची भेट घेणे गरजेचे होतं मात्र तसेच चित्र दिसले नाही केवळ शिक्षक आमदार प्रकाश हुक्केरी यांनी डी के यांची धावती भेट घेतली.

सतीश विरुद्ध डी के शिवकुमार या लढाईमध्ये आगामी दिवसात कलगीतुरा रंगणार का? लोकसभेपूर्वी हे वॉर शमणार की याचा थेट परिणाम विद्यमान सरकारवर होणार या सर्व गोष्टींसाठी आणखी थोडेच नक्कीच वाट पाहावी लागेल असं राजकीय जाणकारांचे म्हणणं आहे.Dasra advt

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.