बेळगाव लाईव्ह:राकसकोप (ता. जि. बेळगाव) गावच्या बाहेरगावी स्थायिक झालेल्या आणि गावातील हौशी युवकांमार्फत दरवर्षीप्रमाणे खास दसरा सणानिमित्त ‘एक दिवस गावासाठी’ हा आगळा कार्यक्रम येत्या शनिवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला.
राकसकोप गावातील राजा शिवछत्रपती शिवाजी चौक येथील समाज भवनात आयोजित या कार्यक्रमांमध्ये गावातील इयत्ता सातवी, दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सेवानिवृत्त झालेल्या गावातील नागरिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
या खेरीज एक प्रबोधनात्मक व्याख्यान देखील होणार आहे. यावेळी हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ मधुकर विठोबा जाधव हे ‘छत्रपती शिवरायांचे मावळे आणि आजची तरुणाई’ या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान देणार आहेत.
एक दिवस गावासाठी या कार्यक्रमात भारतीय सैन्यात 26 वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले सुभेदार अजय मारुती कंग्राळकर हे सेवानिवृत्तपर तसेच एमबीबीएस प्रवेश मिळवून राकोसकोप मधील पहिला डॉक्टर होण्याचा सन्मान मिळवणाऱ्या यश मोहन पाटील यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे.
तरी राकसकोपसह पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमाचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.