बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुंबई येथे बुधवारी (दि. ११) तज्ज्ञ समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. सात महिन्यांनंतर ही बैठक होत असून विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व तत्कालीन गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्या बैठकीत दोन्ही राज्याकडून अधिकाऱ्यांची संयुक्त समिती सुव्यवस्था अबाधित राखण्याचा निर्णय घेतला होता. पण, या समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे तज्ज्ञ समितीच्या बैठकीत या प्रमुख विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
तीन-तीन मंत्री आणि स्थापन करण्याचा आणि
सीमाभागातील कायदा व याशिवाय सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी खंडपीठात महाराष्ट्र किंवा कर्नाटकातील न्यायमूर्ती येऊ नये, असा पत्रव्यवहार करणे, लवकर सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी प्रयत्न करणे आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
खासदार धैर्यशील माने हे तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष असून T सरकारच्या विविध खात्याचे अधिकारी, वकील यांचा समितीत समावेश आहे. सीमाभागातून माहिती देण्यासाठी अड. राजाभाऊ पाटील आणि – अॅड. राम आपटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. अॅड. आपटे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे त्या जागेवर वकील महेश बिर्जे यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.