बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये अज्ञातांनी कर्नाटक परिवहन मंडळाची बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे.
धाराशिव (महाराष्ट्र) जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये तुरोरी येथे कर्नाटक मधून उमरगाकडे येणारी कर्नाटक परिवहन मंडळाची बस (क्र. केए 38 एफ 1201) अज्ञातांनी पेटवली.
बसमधील प्रवाशांना खाली उतरवून ही बस पेटवून देण्यात आली. सदर बस कर्नाटकातील भालकीहून उमरगा मार्गे पुण्याकडे जात होती.
बसमध्ये चालक अनिलकुमार बिरादार व वाहक राजकुमार शिंदे यांच्यासह एकूण 40 प्रवासी होते. हे सर्वजण सुखरूप असले तरी आगीत जळून बस मात्र बेचिराख झाली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील बीड मध्ये आमदारांचे घर देखील पेटविण्यात आली होते अनेक ठिकाणी जाळपोळ घटना घडल्या आहेत त्या पाश्र्वभूमीवर कर्नाटक बस पेटविण्यात आली आहे.