बेळगाव लाईव्ह:शाहूनगर येथील एका दागिन्याच्या दुकानाचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार भरदिवसा आज सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेमकी किती चोरी झाली? की प्रयत्न होता हे मात्र तात्काळ समजू शकले नव्हते.
शाहूनगर येथील श्री संतोष ज्वेलर्स या दागिन्याच्या दुकानाचे शटर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तोडून तिघा चोरट्यांनी चोरीचे कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेज वरून स्पष्ट झाले आहे. सदर चोरीच्या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आणि एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्यासह अन्य कांही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश आणि पी. व्ही. स्नेहा यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. तसेच आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसमवेत चोरीच्या घटनेबाबत चर्चा करून पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले. दरम्यान ठसे तज्ज्ञाना पाचारण करण्यात आले.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीस श्वान पथकही मागविण्यात आले. मात्र ते दागिन्यांच्या दुकानापासून कांही अंतरावर जाऊन तेथेच घुटमळले. भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्याने बंदूक डोक्याला लावली होती स्वतः किरकोळ जखमी झाल्याचे सराफी दुकानाच्या शेजाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
श्री संतोष ज्वेलर्स मधील किती दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला ? का हा चोरीचा प्रयत्न होता ?हे तात्काळ समजू शकले नाही. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.