बेळगाव लाईव्ह :कोणत्याही पदवीशिवाय बेकायदेशीरपणे औषधोपचार करत असलेल्या एका दावाखान्यावर कारवाई बनावट डॉक्टर आणि इस्पितळ जप्त केले आहे.
जनतेच्या तक्रारीवरून जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.महेश कोणी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुन्नादुली, तालुका आरोग्य अधिकारी किवदसण्णा यांनी कारवाई केली आहे.
खानापूर तालुक्यातील नंदगड येथील
मकतुम मलदरा या बनावट डॉक्टरच्या दवाखान्याला भेट दिली जो कोणत्याही पदवीशिवाय बेकायदेशीरपणे औषधोपचार करत होता त्याच्यावर कारवाई केली आहे.
खानापूर तालुक्यातील नंदगड या दवाखान्यात नियमांचे पालन न केल्याबद्दल क्लिनिकची पाहणी देखील अधिकाऱ्यांनी केली.
बुधवारी नंदगड येथील जनता दर्शन कार्यक्रमासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना नंदगडच्या जनतेने लेखी तक्रार दिली होती त्यानंतर हरकत मध्ये आलेल्या जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह बनावट डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून ताब्यात घेतले.
गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या तालुक्यातील अशा शेकडो डॉक्टरांवर कारवाई व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
What next.,