Monday, November 25, 2024

/

सीमा भागातील रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून कशी मिळणार मदत

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून बेळगावसह सीमाभागातील रुग्णांना मदत मिळणार असून तशी तरतूद करण्यात आली आहे या संदर्भात लवकरच महाराष्ट्र शासनाचा एक अधिकारी चंदगड येथे नियुक्त केला जाणार आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिफारस पत्रावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची मदत सीमा भागातील रुग्णांना उपलब्ध होणार आहे मात्र हा निधी कसा मिळवावा हा प्रश्न सर्वांना पडला असताना त्या संदर्भात खालील प्रमाणे माहिती उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या वैद्यकीय कक्षाचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायय्ता निधी नेमक कसा मिळवावा? या संदर्भात वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी 8650567567 टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर कॉल केल्यास ज्या आजारांसाठी आणि महागड्या वैद्यकीय शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य निधी दिला जातो त्याची यादी आणि त्यासाठी करावयाचा अर्ज या संदर्भातील सीएम फंड नावाची लिंक एसएमएसद्वारे उपलब्ध करून दिली जाते.

सदर लिंक वर क्लिक केल्यानंतर सहाय्यता निधी मिळवण्यासाठीचा अर्ज मोबाईलवर उपलब्ध होतो. सदर अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढायची. या अर्जासोबतच शस्त्रक्रिया व उपचारांची यादी आणि कोण कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती दिली जाते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी प्रामुख्याने रुग्णाचा आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदार प्रमाणीत, वार्षिक 1 लाख 60 हजार पेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला, हॉस्पिटलचा येणारा खर्च, रस्ते अपघातग्रस्त, जळीतग्रस्त अथवा विजेचा धक्का लागलेला रुग्ण असेल तर पोलीस डायरी रिपोर्ट, कॅन्सरचा रुग्ण असेल तर बायपसी रिपोर्ट, कोणत्याही प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाचा रुग्ण असेल तर जेटीसीचा रिपोर्ट, या पद्धतीने जो आजार रुग्णाला आहे त्या अनुषंगाने आवश्यक रिपोर्ट आवश्यक असतील.Cm fund maharashtra

मिळाल्यास स्थानिक लोकप्रतिनिधीचे शिफारस पत्र. अर्जासह आपण ही कागदपत्र जर व्यवस्थित भरली तर एका वर्किंग वीक मध्ये अवघ्या आठवड्याभरात म्हणजे सोमवारी अर्ज केला तर शुक्रवारपर्यंत संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये दाखल आहे त्या रुग्णालयाकडे सहाय्यता निधी वर्ग केला जातो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज करण्याकरिता मंत्रालयात जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या ठिकाणी आहात तेथून आपण अर्ज मेल करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने हे अर्थसहाय्य मिळवता येऊ शकतो. यासाठी कुठलाही मध्यस्थ मार्फत किंवा कुठला एजंट मार्फत दलाला मार्फत बिलकुल अर्ज करण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून आपण हा अर्ज मेल करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने अर्थसहाय्य मिळू शकता.Dasra advt

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामधून अर्थसहाय्य मिळवण्याचे प्रक्रिया संपूर्णपणे नि:शुल्क आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज केल्यानंतर पाठपुराव्यासाठी कोणालाही फोन गरज नाही. संबंधितांनी सीएम फंड टोल फ्री नंबरच व्हाट्सअपवर वापरावा. व्हाट्सअप वर फक्त ‘हाय’ असा संदेश टाकताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून चार्टबोर्ड मराठीसह प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध करून दिला जातो. त्याद्वारे आपल्याला अर्जाची स्थिती आजाराविषयी माहिती आणि नोंदणीकृत रुग्णालय याची माहिती मिळते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामध्ये जेवढी रुग्णालय अंगीकृत आहेत, जेवढी रुग्णालय एमपॅनल आहेत. तेवढ्याच रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

नोंदणीकृत रुग्णालयाला टाईप केल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्रत्युत्तर येणार त्यामध्ये महाराष्ट्रातील जेवढी रुग्णालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये अंगीकृत आहेत त्याची माहिती मिळणार. आजाराविषयी माहिती वर क्लिक केल्यास कोणत्या आजारावर अर्थसहाय्य केले जात त्याची यादी मिळते. या योजनेअंतर्गत सध्या असंख्य उपचार सुविधा उपलब्ध आहेत तसेच नव्या सुविधांविषयी 8650567 या क्रमांकावर अधिक माहिती मिळू शकते. सर्वात शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीकडे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अर्ज करताना जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्या नंबरवर आलेला ईएम नंबर आलेला असतो तो नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज नाकारला आहे की स्वीकारला आहे.Dasra advt

नाकारला असेल तर का नाकारला आहे? याची माहिती देण्याबरोबरच प्रलंबित अर्जाबाबत कळवले जाते. एकंदर ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी 8650567567 टोल फ्री क्रमांक अतिशय महत्त्वाचा आहे, असे मंगेश चिवटे यांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.