बेळगाव लाईव्ह : एफ आर पी देऊन सुद्धा अनेक साखर कारखान्याच्या बॅलन्सशीट वर पैसा भरपूर शिल्लक आहे शेतकऱ्यांचे पैसे दाबले गेले आहेत म्हणून त्यांनी दुसऱ्या हप्त्याच्या रूपामध्ये दसऱ्यापूर्वी शेतकऱ्याला किमान एका टनाला 400 रुपये द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
बेळगाव येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली आहे.
सोमवारी दुपारी शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला त्यात देखील राजू शेट्टी यांनी सहभाग दर्शवला.
सम्राट अशोक सर्कल किल्ला ते चन्नम्मा सर्कल पर्यंत भव्य मोर्चा काढून डबल दोन तास चन्नमा सकल मध्ये आंदोलन करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते आणि स्थानिक पोलिसांमध्ये अनेक बाचाबाच चे प्रसंग घडले. चन्नामा सर्कल होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा ने आंदोलन केले जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.
दुपारी बारा ते दोन च्या दरम्यान झालेल्या या रस्ता रोको मध्ये शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आरटीओ सर्कल ते त्यांना पर्यंत मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आंदोलनात सहभागी झाले होते त्यावेळी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती त्यांना परिसरात आंदोलन झाले तरी ट्राफिक जामचा फटका मात्र बेळगाव शहरात मध्यवर्ती भागात देखील बसताना दिसत होता.
गणेशोत्सवात लोकांच्याकडे पैसा नव्हता त्यामुळे सनद देखील उत्साह नव्हता आता दसरा सण उंबरठ्यावर आहे दसऱ्याच्या अगोदर जर शेतकऱ्यांना चारशे रुपये दर मिळाला तर नक्कीच दसरा सण बाजार पेठ फुलून जाईल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात आनंद येईल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी
कारखान्यांना एफआरपी देऊन सुद्धा साखरेला चांगला दर मिळालेला आहे त्यातूनही पैसे मिळालेले आहेत इथेनॉल आणि खोजन चे पैसे मिळालेले आहेत असे असताना कारखानदारांची शेतकऱ्यांना पैसे देण्याची प्रवृत्ती दिसत नाही. राज्य सरकारने यांची मानवूड धरून शेतकऱ्यांना पैसे काढून द्यावेत अन्यथा कारखानदारांना खुश करण्यासाठी सरकार त्यांना पाठीशी घालणार असेल तर सरकारला सुद्धा त्याची किंमत चुकती करावी लागेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
आगामी सहा महिन्यानंतर लोकसभा निवडणूक आहेत जर सरकारने कारखानदारांना खुश केले तर मतं सुद्धा शेतकऱ्यांऐवजी सरकारने कारखानदाराकडेच मागावित शेतकऱ्या कडे मते मागू नयेत असा देखील टोला त्यांनी लगावला.