बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील सीमाभागातील काळातील कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधी निश्चितपणे सामील होतील, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी छेडले असता ते बोलत होते. येत्या 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागात काळा दिन पाळला जातो. मात्र त्या ठिकाणी तो पाळण्यास परवानगी दिली जात नाही.
दरवर्षी महाराष्ट्रातील प्रतिनिधी काळा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे तसे यावेळी होणार का? या प्रश्नाला यावेळी देखील सीमा भागातील काळातील कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधी सहभागी होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
https://x.com/belgaumlive/status/1718526129709957422?s=20