कामाचे बिल मंजूर होत नसल्यामुळे ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यासमोरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे.
बेळगाव किल्ला परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागात ही घटना घडली असून नागप्पा बांगी असे या ठेकेदाराचे नाव आहे. कंत्राटदाराने कार्यकारी अभियंता एस. एस. सोबार यांच्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोबार यांनी रस्ते देखभालीचे बिल मंजूर न केल्याने नागाप्पा बांगी या ठेकेदाराने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.
लोकांनी नागप्पा बांगी यांना तत्काळ रुग्णालयात नेऊन उपचार केले. सध्या नागप्पा बांगी यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.