बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने बुडा आपल्या नियोजित कणबर्गी निवासी वसाहतीच्या प्रकल्पासाठी सल्लागार फर्म्सकडून निविदा मागविणार असल्याचे नुकतेच जाहीर केल्यामुळे या प्रकल्पाला लवकरच पुन्हा चालना मिळणार आहे.
बुडाने योजल्याप्रमाणे सर्वकांही सुरळीत झाल्यास येत्या फेब्रुवारी 2024 पासून या प्रकल्पातील भूखंड सार्वजनिकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कणबर्गी निवासी प्रकल्प प्रारंभी एकूण 159 एकर आणि 23 गुंठ्यांमध्ये साकारण्यात येणार होता. मात्र यामध्ये 30 एकर जमिनीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पास विरोध केल्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे आता शिल्लक असलेल्या जमिनीमध्ये हा प्रकल्प राबविला जाण्याची शक्यता आहे.
न्याय प्रविष्ट असलेला कणबर्गी प्रकल्पाचा वाद बुडाला शहराच्या नव्या आराखड्याची (लेआउट) अंमलबजावणी करण्यात प्रमुख आडकाठी करणारा ठरत आहे. सरकारने सुरुवातीला 60:40 या प्रमाणात शेतकऱ्यांशी जमीन वाटप सुचविले होते मात्र शेतकऱ्यांनी हे प्रमाण फेटाळून लावल्यामुळे पन्नास पन्नास असे प्रमाण ठरविण्यात आले.
हे प्रमाण 30 एकर जमिनीचा मालकी हक्क असलेले शेतकरी वगळता अन्य बहुतांश शेतकऱ्यांनी मान्य केले आहे. बुडाने आता कणबर्गी निवासी प्रकल्पासाठी सल्लागार फर्म्सकडून निविदा मागविणार असल्याचे नुकतेच जाहीर केल्यामुळे या प्रकल्पाला लवकरच पुन्हा चालना मिळणार आहे.
When is Belgaum to Pune aircraft going to take-off? Last 4/5 years this flight is not existing.