बेळगाव लाईव्ह :विमान सेवांचे हिवाळी वेळापत्रक अंमलात आले असल्यामुळे इंडिगो एअरलाइन्सच्या बेळगाव -दिल्ली विमान सेवेच्या वेळेत बदल झाला आहे. आता ही विमानसेवा येत्या 29 ऑक्टोबरपासून सकाळच्या सत्रात सुरू होणार आहे.
इंडिगो एअरलाइन्सच्या बेळगाव ते दिल्ली विमानसेवेच्या बदललेल्या वेळापत्रकानुसार इंडिगो 6 ई 2511 हे विमान येत्या रविवारी 29 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथून सकाळी 6:20 वाजता सुटून सकाळी 8:50 वाजता बेळगावला पोहोचेल.
त्याचप्रमाणे इंडिगो 6 ई 2512 हे विमान सकाळी 9:20 वाजता बेळगावहून प्रस्थान करून 11:50 वाजता दिल्लीला पोहोचेल. बेळगाव ते दिल्ली हा विमान प्रवास अडीच तासाचा असणार आहे.
आता सध्याच्या वेळापत्रकानुसार इंडिगो विमानाचे दुपारी 3:45 वाजता दिल्ली येथून प्रस्थान होऊन बेळगावला 6:15 वाजता बेळगावला आगमन होते. त्यानंतर परतीच्या प्रवासात हे विमान सायंकाळी 6:30 वाजता बेळगाव येथून प्रस्थान करून रात्री 9 वाजता दिल्लीला पोहोचते.
गेल्या आठवड्याभरात 180 पैकी ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या सरासरी 150 च्या घरात आहे त्यामुळे या विमान सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.