Sunday, November 17, 2024

/

व्यसने करतात उध्वस्त आयुष्य…

 belgaum

बेळगाव लाईव्ह : व्यसनं… ‘उध्वस्त करणारी माणसाला कुटुंबाला आणि समाजालाही..’ दारू गुटखा जुगार आणि कितीतरी या व्यसनांची रूपे.. चिरेबंदी समाज व्यवस्थेला उध्वस्त करून टाकणारी… एखाद्या टोलेजंग वाड्याच्या दर्जेमध्ये एखाद्या झाडाचे मूळ रुजावे आणि अख्खी इमारत खिळखिळी व्हावी तशी व्यसने हादरवून सोडतात माणसाच्या जगण्याला..

एक उदाहरण देता येईल …एका व्यक्तीला तीन मुली आणि एक मुलगा अशी अपत्ये .. कुटुंबाचे उत्पन्न चिंधी सारखे. त्याच्या स्वतःच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज फिटत नव्हतं त्यातही डॉक्टरने सांगितले त्याच्या एकुलत्या एक मुलाला हृदयात छिद्र आहे शस्त्रक्रिया करावी लागेल खर्चाचा आकडा ऐकून तो ढेपाळलाचं. घरातील आजारपण याला कंटाळून त्याने व्यसनाला कवटाळले दारूच्या बाटली सोबत त्याने दुःख विसरण्याचा प्रयत्न केला दुःख कमी झालं नाहीच पण दारिद्रय मात्र त्याच्या घरात मुक्कामाला आलं.

दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होऊ लागली पैसा संपेल तसा तो हाथ भट्टीच्या दारू कडे वळला. तो चिंता विसरण्यासाठी दारूत बुडत होता दारू हळूहळू त्याला चीतेकडे नेत होती. दारू त्याच्या अंगावर दिसायला लागली अंग सुजू लागले लिव्हर खराब झाले किडनी वर हृदयावर दबाव आला दोन्ही किडन्या निकामी झाल्या डायलेसिस कडे त्याचा प्रवास सुरू झाला साध्या साध्या गोळ्याचे बिल भागवायला देखील त्याच्याकडे पैसे नव्हते बायकोच्या गळ्यातील लाखी मण्याचे मंगळ सूत्र औषध होऊन वाहून गेलं.

टीचभर असणारा जमिनीचा तुकडा देखील त्यांच्या आजार पणामुळे उसवला देखील नाही. सगळ तसचं परोस पडलेलं. त्याच्या व्यसनाने नांदत घर खिळा मोडलेल्या गाडी सारखं जागेवरच बसलं सगळचं कसं स्तब्ध अंधारात बुडलेलं केवळ व्यसनाने नांदत घर लयाला गेलं.

आजारी पोरगा, डोळ्यात स्वप्नं घेतलेल्या पोरी आणि काळा कबींनन समोर घेऊन वावरणारी त्याची बायको व्यसनाने खोल खोल अंधारात बुडत गेली. व्यसनाने प्रश्न सुटत नसतात केंदाळात अडकलेल्या पायासारख जंजाळात अडकवत नेतात. व्यसनाने त्याचे प्रश्न तर सुटलेच नाहीत पण त्याच्या गाठीला बांधलेले चार जीव मात्र उध्वस्त होत गेले.Dasra advt

त्यानं ठरवलं असते तर या घराचा बुरुझाचा दर्जा भरून तो घर वाचवू शकला असता खर त्याच्या व्यसनाने मातीतलाही जीव निघून गेला म्हणून व्यसनं प्रश्नांची उत्तरे नसतात तर व्यसने प्रश्न निर्माण करतात या व्यसनाच्या जेवढ्या तुम्ही जास्त दूर जाल तेवढी सुखाची पावले तुमच्या दारात आनंदाने येतील या हसऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने एवढं सांगावेसे वाटते सुखाची सोंन पाऊले तुमच्या अंगणात यायची असतील तर गुटखा मावा दारू जुगार आदी तत्सम व्यसनापासून दूर राहा.

बेळगाव शहरातील गणपती गल्लीतील संतोष प्लास्टिकचे मालक रमेश पावले अनेकदा बोलताना सांगतात व्यसनापासून दूर राहा आणि जगण्याचा मूलमंत्र मिळवा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.