Sunday, October 6, 2024

/

वाहतूक मार्गात उद्या दुपारपासून होणार ‘असा’ बदल

 belgaum

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने शहराच्या कांही वाहतूक मार्गात बदल केले असून त्याची अंमलबजावणी उद्या गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून विसर्जन संपेपर्यंत केली जाणार आहे.

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला उद्या गुरुवारी शहरातील नरगुंदकर भावे चौकातून प्रारंभ होणार असून तेथून मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक (बोगारवेस),

रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, श्री शनी मंदिर, कपिलेश्वर ओव्हर ब्रिज मार्गे श्री कपिलेश्वर मंदिर येथे समाप्त होईल. या पार्श्वभूमीवर शहरातील कांही मार्गावरील वाहतूक उद्या गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून पुढील प्रमाणे अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

अशोक चौक किल्ल्यापासून आरटीओ, चन्नमा सर्कल, कॉलेज रोड मार्गे खानापूरकडे जाणारी सर्व वाहने आरटीओ सर्कल येथून कोल्हापूर सर्कल, वाय. जंक्शन, सदाशिवनगर लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्यानगरमधून बाची क्रॉस, गांधी सर्कल (आरगन तलाव), शौर्य चौक (मिल्ट्री हॉस्पिटल सर्कल), केंद्रीय विद्यालय क्र. 2, शरकत पार्क, ग्लोब थिएटर सर्कलपासून खानापूरला सोडली जाईल.

जिजामाता सर्कल, देशपांडे पेट्रोल पंप, निगुंदकर भावे चौक (कंबळी खुट), पिंपळ कट्टा, पाटील गल्ली येथून येणारी वाहने जिजामाता सर्कलपासून थेट सीबीटी किंवा पॅटसन शोरूम पासून जुन्या पी.बी. रोड मार्गे महामार्गाकडे जातील.

खानापूरकडून येणारी वाहने गोगटे सर्कलकडून आंबाभुवन, ग्लोब थेटर पासून शरकत पार्क, आरगन तलावापासून गणपती मंदिराला वळसा घालून हनुमाननगर डबल रोड मार्गे बॉक्साइट रोड व हिंडाल्को मार्गे राष्ट्रीय महामार्गावर बाहेर पडतील. बॅ. नाथ पै सर्कलकडून येणारी वाहने बँक ऑफ इंडिया, एसपीएम रोड, कपलेश्वर ब्रिजकडून बँक ऑफ इंडिया चौकातून डाव्या बाजूने पी.बी. रोड मार्गे जातील. जुन्या पीबी रोड व्हीआरएल लॉजिस्टिक, भातकांडे स्कूल, कपलेश्वर ओव्हर ब्रिजपासून ध. संभाजी उद्यान रस्ता, बसवेश्वर चौक, बॅ. नाथ पै सर्कल मार्गे पुढे जातील.

जुन्या पी.बी. रोड, यश हॉस्पिटल महाद्वार रोड, कपलेश्वर मंदिरापासून रेल्वे ओव्हर ब्रिज मार्गे येणारी वाहने यश हॉस्पिटल जवळून उजव्या व डाव्या बाजूने भातकांडे स्कूल, तानाजी गल्ली रेल्वे गेट मार्गे जातील. गुडशेड रोडपासून कपिलेश्वर ओव्हर ब्रिजकडे जाणारी वाहने एसपीएम रोड मार्गे मराठा मंदिर गोवावेस सर्कल येथून पुढे जातील. वाहतूक मार्गातील हा बदल विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत लागू असणार आहे.

याव्यतिरिक्त उद्या गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून परवा शुक्रवारी दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेतपर्यंत अवजड वाहनांना बेळगाव शहरात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.