बेळगाव लाईव्ह: बेळगावात दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून एका सामाजिक कार्यकर्त्याने माणुसकी दाखवली. सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील यांनी दोन्ही मृतदेहांवर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले.
पश्चिम बंगालमधील एक गरीब माणूस काकती येथे आपल्या पत्नीसह सुतार म्हणून राहत होता. आजारपणामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पतीचे पार्थिव बिहारला नेण्यासाठी पत्नी हजारो रुपये खर्च करत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सदाशिव स्मशानभूमीत हिंदू रीतीरिवाजाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
तसेच जिल्हा रुग्णालयात एका अनाथ रुग्णाचाही मृत्यू झाला. गंगाधर पाटील या समाजसेवकानेही त्या अनाथ प्रेतावर नगरसेवक शंकर पाटील, चिन्मय, विशाल राजू यांच्यासह अनेकांच्या सहकार्याने अनाथ मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या या कार्याचे लोकांतून कौतुक होत आहे.
बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यास माजी महापौर विजय मोरे यांचा नेहमी पुढाकार असतो त्यांनी हजारो मृतदेहावर अंतिम संस्कार केले आहेत त्यांचे हे काम सुरू असतानाच आजच्या घडीला बेळगावात अनेक समाज सेवक आहेत जे अश्या बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करत असतात.
माणुसकीचा झरा आटत जाणाऱ्या या जगात गंगाधर पाटील यांचे कार्य लखलखीत सूर्या सारखे दिसून येते समाज निरामय जगण्यासाठी अश्या कार्यकर्त्यांची गरज असते त्यामुळे अश्या कार्याचे कौतुक झालेच पाहिजे.