बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातला गणेशोत्सवाला कर्नाटक राज्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे देशात पुणे आणि मुंबईनंतर बेळगावतच गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणूनच बेळगावच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक देखील ऐतिहासिक होते.
बेळगावची गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत कशी पार पडली जाईल यासाठी पोलीस प्रशासन पहिल्यापासूनच तयारी करत असते बेळगाव सहा राज्यातील पोलीस दलाची या बंदोबस्ताकडे एक मिशन म्हणून नजर असते . बेळगाव पोलीस आयुक्तालयाने यंदाही विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी कंबर कसली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तयार करण्याचा निर्णय घेतलाय.
गणेश विसर्जन मिरणूक बंदोबस्तासाठी आयुक्तालयातील १,८०० पोलिसांव्यतिरिक्त परजिल्ह्यातून दोन हजार पोलिस मागविले आहेत. यापैकी ५०० दाखल झाले असून आणखी १,५०० पोलिस बुधवारी (दि. २७) बेळगावात दाखल होणार आहेत. मिरवणुकीसाठी चार हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी दिली.
बेळगावचा सार्वजनिक गणेशोत्सव भव्यदिव्यपणे साजरा होतो. सुमारे ३७८ सार्वजनिक मंडळे एकाच दिवशी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतात. शहर व तालुक्यासह सीमाभागातील लोकही मिरवणुकीत सहभागी होतात.
या दिवशी लाखो लोकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिस खात्याकडूनही बंदोबस्ताची जय्यत तयारी केली जाते. याबाबत आयुक्त सिद्धरामप्पा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बंदोबस्ताच्या नियोजनाची माहिती दिली.
गेल्या आठ दिवसांपासून बेळगावातील गणेशोत्सव बंदोबस्त शांततेत सुरु आहे. ठाणेनिहाय बैठका, गणेशोत्सव महामंडळ, पंच कमिटी यांच्याशी वेळोवेळी झालेली चर्चा यानुसार बंदोबस्ताची आखणी केली आहे. शहर
व आयुक्तालयातील १,८०० पोलिस बंदोबस्तावर आहेत.गुरुवारी (दि. २८) निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी आणखी कुमक लागणार आहे. यासाठी राज्य पोलिस खात्याला यापूर्वीच
असा असेल बंदोबस्त
पोलिसप्रमुख.. ४
उपअधीक्षक २०
निरीक्षक…………. ४५
उपनिरीक्षक… ७७
साहाय्यक उपनिरीक्षक१६६
केएसआरपी तुकड्या. ५
जलद कृती दल तुकडी.. १
परजिल्ह्यातील पोलिस ……२,०००
आणखी १,५०० पोलिस बुधवारी शहरात दाखल होत आहेत. मिरवणुकीच्या बंदोबस्ताचे नियोजन झाले असून, बुधवारी सर्व अधिकारी अधिकाऱ्यांना व पोलिसांना बंदोबस्ताची जागा ठरवून दिली जाणार आहे.त्यानुसार बंगळूर, म्हैसूर, मंगळूरसह काही जिल्ह्यांतील कुमक बंदोबस्तासाठी पाठवून देण्याचे आश्वासन वरिष्ठांनी दिले आहे. त्यानुसार मंगळवारी ५०० पोलिस बेळगावात दाखल झाले आहेत.