Thursday, December 19, 2024

/

जिद्द आणि चिकाटी चे नाव अश्विनी

 belgaum

बेळगाव लाईव्ह: हे राष्ट्र निर्मिले आमच्या मनगटावर हे राज्य राखीले आमच्या शोर्यावर… हे राष्ट्र हे राज्य हा देश आमची संपत्ती आहे, याच्यावर आमचा गर्व आहे असं केवळ तोंडाने न म्हणता आपल्या कृतीने सिद्ध करणारे पाटील कुटुंब समाजा पुढे विशेष आदर्श निर्माण करतात. गुणतक्त्यात कायम आघाडीवर असणारी अश्विनी केवळ सुखमय आयुष्य जगण्याला उपयोगी असणाऱ्या कोर्सेस कडे न वळता आपल्या पूर्वजांनी केलेला देश सेवेचा वसा सांगत सीआरपीएफच्या खडतर वाटेवर काट्याना फुले समजत चालू लागली आणि एक इतिहास घडत गेला जिद्द आणि चिकाटीचे नाव अश्विनी…आणि ही संघर्ष गाथा

घरात गरीब परिस्थिती, पदरात तीन मुली आणि एक मुलगा, शिक्षणाची पहिल्यापासूनच हौस, त्यामुळे परिस्थितीवर मात करून उद्यमबाग येथे कारखान्यात काम करून सर्व मुलांना शिकविणाऱ्या पिरणवाडी येथील निंगाप्पा पाटील यांच्या मुलीने सीआरपीएफ मध्ये यश मिळविले आहे. तिच्या धवल यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

निंगाप्पा पाटील यांची मुलगी अश्विनी निंगाप्पा पाटील हीची सीआरपीएफ एसएससी जीडी मध्ये निवड झाली आहे.Ashwini

घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे निंगाप्पा पाटील हे उद्यमबाग येथील खासगी कारखान्यात कामाला आहेत. पण आपल्या परिस्थितीचा कोणताही परिणाम आपल्या मुलींवर त्यांनी होऊ दिला नाही. तिन्ही मुलींना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले. मुलगाही डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे.

बंगलोर येथे एसएससी जीडी सीआरपीएफ मध्ये भरती झालेल्या अश्विनी पाटील ही सुरुवातीपासूनच हुशार मुलगी म्हणून ओळखले जाते. दहावी मध्ये तिला 84 टक्के गुण मिळाले होते. ज्योती कॉलेजमध्ये सायन्स मध्ये तिला 72 टक्के गुण मिळाले. तर सध्याचे बीएससी शेवटच्या वर्षात शिकत असून शिक्षण घेत असतानाच तीने सी आर पी एफ ची परीक्षा दिली होती. आपल्या हुशारीने तिने या परीक्षेत यश संपादन केले आहे. दहावीच्या गुणावर तिची निवड झाली असून काही दिवसात ते बेंगलोर येथे प्रशिक्षनासाठी जाणार आहे.Aswini

घरच्या परिस्थितीवर मात करून आपल्या मुलींना स्वावलंबी करण्यासाठी निंगाप्पा पाटील यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले आहे. त्यांची मोठी मुलगी खाजगी कंपनीत कामाला असून दुसऱ्या क्रमांकाच्या अश्विनीची सीआरपीएफ मध्ये निवड झाली आहे. तिसरी मुलगी बीकॉम शिकत आहे तर मुलगा डिप्लोमा चे शिक्षण घेत आहे. परिस्थिती समोर हार ना मानतात मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या निंगाप्पा पाटील यांच्या कष्टा बाबत परिसरात कौतुक करण्यात येत आहे. सी आर पी एफ सारख्या शारीरिक कसरत असणारी परीक्षा तिने पिरनवाडी येथील महालक्ष्मी आर्मी कोचिंग सेंटर च्या मार्गदर्शनानुसार पूर्ण केली.

अश्विनीच्या या जीवन प्रवासातून नव तरुणींनी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या मनगटात बळ भरून स्त्री अबला नाही तर दुर्गा आहे हे सिद्ध करू शकता अश्विनीला टीम ‘Belgaum Live -बेळगाव लाईव्ह ‘ कडून शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.