बेळगाव लाईव्ह :नॅशनल क्वालिटी अॅश्युरन्स स्टँडर्ड्स (एनक्यूएएस) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्र गुणवत्ता प्रमाण राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये बेळगाव शहरातील तीन आरोग्य केंद्रांना हा पुरस्कार मिळाला आहे.
स्वच्छता, मूलभूत सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, प्रयोगशाळांचे कामकाज, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांची अंमलबजावणी, बाह्यरुग्ण रुग्णांची तपासणी, माता आणि बाल आरोग्य कार्यक्रम यावर आरोग्य केंद्रांसाठी दरवर्षी एनक्यूएएस पुरस्कार दिले जातात.
बेळगाव जिल्ह्यातील ९ आरोग्य केंद्रांना यंदा हा पुरस्कार लाभला आहे.
बेळगाव शहरातील वंटमुरी कॉलनी, रामनगर आणि रुक्मिणी नगर प्राथमिक आरोग्य केंद्राला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.