Wednesday, December 25, 2024

/

रस्त्याची निघते खपली कोण करणार मलमपट्टी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गावे सुधारावी गावे देखणी व्हावी गावे स्वच्छ व्हावीत यासाठी सरकारी पातळीवर जाहिरात बाजी सह प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते निधी ही उपलब्ध करून दिला जातो परंतु कमिशन राज च्या विळख्यात अडकलेली विकास कामे दर्जा हरवून बसलेली आहेत. बेळगाव स्मार्ट सिटीच्या हजारो कोटींच्या कामापासून ते बोकनुर ग्राम पंचायतीच्या लाखोंच्या कामा पर्यंत अशीच अवस्था आहे.

बोकनूर (ता. जि बेळगाव) येथील एससी-एसटी कॉलनीतील आठवड्यापूर्वी केलेल्या काँक्रीटच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने गावकऱ्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बोकनूर येथील एससी-एसटी कॉलनीमधील रस्त्यांचे आठवड्यापूर्वी कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र हे कॉंक्रिटीकरण इतके निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे की फावडा वगैरेने नुसते खरवडले तरी रस्त्याचे काँक्रीट उखडत आहे. कॉंक्रिटीकरण करताना त्यामध्ये सिमेंटचा पुरेसा वापर करण्यात आला नसल्यामुळे सदर रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे.

त्यामुळे रस्त्याच्या या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्याबरोबरच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान गाव कमिटीच्या सदस्यांनी सदर रस्त्याची पाहणी करून कंत्राटदाराला जाब विचारला आहे.Boknur

कंत्राटदाराने रस्ता चांगल्या प्रकारे दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले असले तरी निकृष्ट दर्जाचा हा तयार काँक्रीट रस्ता पुन्हा कसा काय दुरुस्त होणार? असा सवाल केला जात आहे. तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

काल केलेला रस्ता आज खड्ड्यात बदलला जात आहे आलेला निधी याच खड्ड्यातून भ्रष्टाचाराचा टाहो फोडत आहे या कामांचे परीक्षण करून आढावा केला जातो की नाही ही प्रश्न ऐरणीवर आला आहे.गावकऱ्यांच्या डोळ्यातील विकासाच्या आशेचे भाव दिवसेंदिवस थिजून जात आहेत त्यांच्या कष्टाला तर पारावर राहत नाही ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत उधळलेला पैसा सिमेंटच्या रूपाने परत वसूल केला जात आहे आणि नवीन बांधलेले सिमेंटचे रस्ते जखमी वरची खपली निघाल्या सारखे उखडून जात आहेत आता या मलम पट्टी करायची कुणी?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.