बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात कायदा सुव्यवस्था हाताळण्यात यशस्वी झालेले एस पी संजीव पाटील यांच्या बदलीचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.
राज्य सरकारने राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्या यादीत संजीव पाटील यांचा समावेश आहे.
बेळगावच्या नूतन एस पी पदी भीमाशंकर गुळेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते 2012 च्या बॅचचे कर्नाटकचे आयपीएस अधिकारी आहेत.
बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्याची जबाबदारी नव्या एसपीकडे आहे.
या पार्श्वभूमीवर नवनियुक्त अधिकाऱ्याकडे लोकांचे लक्ष अधिक लागले आहे. राज्य सरकारने बेळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजीव पाटील यांची बेंगळुरूच्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे.