Sunday, December 29, 2024

/

मैसूरु धारवाड रेल्वे बेळगाव पर्यंत वाढविली

 belgaum

बेळगाव लाईव्ह: आता बेळगाव हून मैसुरुला ये जा करण्यासाठी बेळगाव शहरातून रेल्वेसेवा उपलब्ध झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अनेक वर्षांपासूनची जुनी असलेली रेल्वे प्रवाशांची मागणी पूर्ण झालेली आहे. धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस गाडी बेळगावपर्यंत वाढविण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आल्याची माहिती राज्यसभा खासदार ईराण्णा कडाडी यांनी दिली आहे.

खासदार ईराण्णा कडाडी यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार सांगितले की रेल्वे क्रमांक17392 बेळगावहून सायंकाळी 7:45 वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 7:10 वाजता म्हैसूरला पोहोचेल.
बेळगाव गाडी क्रमांक 17301 म्हैसूरहून रात्री 10.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 वाजता बेळगावला पोहोचेल.

बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धावण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.Indian railway

माझ्या विनंतीला प्रतिसाद देत बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो असेही त्यांनी नमूद केले आहे.

बेळगाव हून मैसुरूला जाण्यासाठी बेळगाव हून बससेवा उपलब्ध आहे मात्र रेल्वेने जाण्यासाठी हुबळी किंवा धारवाडला जावे लागत होते त्यासाठी या गाडीचा उपयोग प्रवाश्यांना होणार आहे.लवकरच बेळगाव मैसुरू विमान सेवा देखील सुरू व्हायची शक्यता आहे त्यामुळे बेळगाव मैसुरू संबंध वृद्धिंगत होतील.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.