बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील बापट गल्ली कार पार्किंगच्या ठिकाणी लवकरच मल्टी लेव्हल कार पार्किंग साकारणार आहे. पीपीपी धर्तीवर म्हणजे सार्वजनिक, खाजगी भागीदारीत या मल्टी लेव्हल कार पार्किंग इमारतीची उभारणी केली जाणार असून त्याचा भूमिपूजन समारंभ आज सोमवारी आयोजित करण्यात आला होता.
सदर मल्टी लेव्हल अर्थात बहुमजली कार पार्किंग इमारत उभारणीचे कंत्राट बीव्हीजी कंपनीला मिळाले आहे. सदर कार पार्किंग इमारत उभारणीसाठी 24 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. बापट गल्ली येथे मल्टी लेव्हल कार पार्किंग उभारण्याची योजना 2004 ते 2005 च्या दरम्यान मांडली गेली. त्यानंतर त्यासाठीच्या योजनाही आखण्यात आल्या.
मात्र आजतागायत बापट गल्ली येथील जुन्या कार पार्किंगच्या ठिकाणी नव्या मल्टी लेव्हल कार पार्किंग इमारत अस्तित्वात आली नव्हती. मात्र आता हे नवे कार पार्किंग उभारण्यासाठी कंबर कसण्यात आली असून बापट गल्ली कार पार्किंग येथे नियोजित मल्टी लेव्हल कार पार्किंगच्या इमारतीचे छायाचित्र असलेले होल्डिंग उभारण्यात आले आहे.को
बीव्हीजी कंपनीकडून पीपीपी धर्तीवर या नव्या मल्टी लेव्हल कार पार्किंग इमारतीची उभारणी केली जाणार असून त्यासाठी दोन वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे.
एकंदर गेली अनेक वर्ष फक्त चर्चेत असलेली बापट गल्ली येथील बहुमजली कार पार्किंगची योजना आता लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे.