बेळगाव लाईव्ह : महापालिकेत कॅन्टोन्मेंट समाविष्ट करण्याचा निर्णयास ना हरकत असा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला त्यानुसार राज्य सरकारला हा प्रस्ताव पाठवणार येणार आहे.
केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहून महापालिका व्याप्तीत कॅन्टोन्मेंट चा समावेश करण्यात यावा याबाबत महापालिकेची ना हरकत मागितली होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने आज सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे आता कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
महापालिका सभागृहात शनिवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या विषय पत्रिकेत महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कॅन्टोन्मेंटचा समावेश करण्यात यावा याबाबत विषय होता.
यावेळी आमदार राजू सेठ यांनी केंद्र सरकारने देशातील कॅन्टोन्मेंट परिसराचा विकास करण्यासाठी संबंधित महापालिका समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशातील पाच कॅन्टोन्मेंटचा महापालिकेत समावेश झाला आहे. त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंटचा महापालिकेत समावेश झाल्यास परिसराचा विकास होऊ शकतो. राज्य सरकारच्या या प्रस्तावाला आमची मंजुरी आहे, असे सांगितले.
कॅन्टोन्मेंट समावेशाचा निर्णय ही मोठी प्रक्रिया आहे, त्यामुळे सध्या ना हरकत देण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार महापौर शोभा सामनाचे यांनी हा ठराव संमत केला.
One step to grab the land ha ha ha