बेळगाव लाईव्ह: विधायक श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माळी गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यंदा व्यसनमुक्ती वरील देखावा सादर केला होता.
दरवर्षी चर्चेत असणाऱ्या या मंडळांने आज दुपारी 1 वाजता आपल्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्याद्वारे यावर्षी शहरातील सर्वात प्रथम मूर्ती विसर्जन करणारे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ हा मान मिळवला आहे.
इस्कॉनच्या पारंपारिक भजनाच्या तालावर या मंडळांने मिरवणुकीने आपल्या बाप्पाच्या मूर्तीचे कपिलेश्वर तलावात विसर्जन केले. या विसर्जन मिरवणुकीत माळी गल्लीतील मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह स्त्री-पुरुष गणेश भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता.
बेळगावत होणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीत आणि गणेश उत्सवात वेगळ्या प्रकारे सामाजिक उपक्रम राबवून माळी गल्लीच्या युवकांनी अनेकदा बेळगाव वर छाप पाडली आहे. यावर्षीही या मंडळाने व्यसनमुक्तीचा देखावा मंडपात सादर करत अनेकांकडून वावा तर मिळवली होतीच शिवाय सामाजिक हिताचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.
अनंत चतुर्थी दिवशी दुपारी एक वाजता पारंपरिक वाद्य इस्कॉन सह मिरवणूक काढून कपिलेश्वर तलावावर या मंडळांनी गणेश मूर्तीचा विसर्जन केला आहे अनंत चतुर्थी दिवशी यंदाचा विसर्जन करणार माळी गल्ली हे पहिलेचसार्वजनिक गणेश मंडळ ठरले आहे.
बेळगाव शहरात घरगुती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे सकाळपासूनच कपिलेश्वरच्या जुन्या तलावावर जक्किन होंडा तलावावर, अंघोळ वडगाव जुने बेळगाव मजगाव कणबर्गी आणि किल्ला तलावावर देखील बेळगाव महापालिकेच्या वतीने विसर्जन कुंड उभे करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने घरगुती गणपतीचे होत आहे.
सायंकाळी पाच वाजता नरगुंदकर भावे चौकातून यंदाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होणार आहे.