बेळगाव लाईव्ह:जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी माणूस लाठीहल्ला केला, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. या संतापात कर्नाटकाच्या बसला आग लावण्यात आली आहे.
जालना येथे अनेक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा कडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनावर शुक्रवारी पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला. त्यामध्ये शेकडो लोक जायबंदी झाले आहेत.
या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. पोलिसांनी लाठी हल्ला केल्यानंतर आंदोलने अनेक वाहनांना लक्ष केले.
त्यामध्ये जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबाद-हुबळी या बसला आग लावण्यात आली.
बस मध्ये कोणीही प्रवासी नव्हते. पण आगीत संपूर्ण बस जळाली असून वायव्य परिवहन मंडळाने दखल घेतली आहे. मराठा आंदोलनाची कर्नाटकलाही झळ बसली आहे.