बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शास्त्रज्ञ प्रकाश पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. भारताच्या इस्त्रो या संस्थेने आपले चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून अशी कामगिरी करणारा भारत जगातील एकमेव देश बनला ही चंद्रयान मोहीम यशस्वी करण्यासाठी देशातील शास्त्रज्ञ गेले तीन-चार वर्षे अहोरात्र झटत होते.
आपल्या खानापूर तालुक्यामधील अनगडी गावचे सुपुत्र प्रकाश पेडणेकर हे इस्त्रो संस्थेमध्ये गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरची भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी करण्यामध्ये अनगडी गावचे सुपुत्र प्रकाश पेडणेकर यांचा सुद्धा सहभाग होता .
या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पुढील कार्याला प्रोत्साहन मिळावे व आपल्या खानापूर तालुक्यातील तरुणांमध्ये या क्षेत्रामध्ये सहभाग घेण्यासाठी ओढ लागावी यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष सूर्याजी पाटील ज्येष्ठ नेते पीएच पाटील माचीगड ग्रामपंचायत सदस्य तुकाराम जाधव गजू पाटील नंदगड गावचे अशोक गोरे यांनी श्री प्रकाश पेडणेकर यांच्या स्वगृही जाऊन श्री प्रकाश पेडणेकर या युवा शास्त्रज्ञाचा व त्यांचे वडील निवृत्त शिक्षक नारायण पेडणेकर व त्यांची आई यांचा मोठ्या उत्साहाने छोटासा सत्कार कार्यक्रम पार पडला.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यामध्ये भास्कर मिराशी, भगवंत गुंडप, विशाल बुत्ते वाडकर, कल्लाप्पा मिराशी, सचिन लोकलकर, तुकाराम पाटील, विठ्ठल मिराशी, परशुराम मिराशी, राजाराम पाटील, वामन पाटील, राहुल पेडणेकर, विश्वनाथ मिराशी, प्रकाश मिराशी पवन मिराशी ,महेश मिराशी, आप्पाजी बुत्तेवाडकर, करण गुंडप, राजेंद्र पाटील, मोनेश्री मिराशी, दिनेश मिराशी, सहदेव मिराशी, अशी बरीच तरुण या सत्कार समारंभाला उपस्थित होते