बेळगाव लाईव्ह -येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे दि.11 ते 17 सप्टेंबर हे 7 दिवस भगवतगीता अभ्यासवर्ग हिंदी व कन्नड भाषेतून तसेच दि 2 ते 8 ऑक्टोबर पर्यंत मराठी व इंग्रजी भाषेतून आयोजित करण्यात आला आहे.
इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर ,शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 पर्यन्त होणाऱ्या या अभ्यासक्रमात भगवद्गीता काय आहे? सुखाचा शोध व मनुष्य जीवनाचे महत्व, भगवान कोण आहेत? मी कोण आहे ?आत्मा काय आहे?
पुनर्जन्म ही एक कल्पना आहे की वास्तविकता? याच बरोबर चांगल्या लोकांच्या बरोबर वाईट का होते ? सर्वोत्तम योग कोणता? आणि व्यावहारिक जीवनामध्ये भगवद्गीतेचे उपयोग काय? या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या अभ्यासवर्गात प्रवचन, लाईव्ह शो, व्हिडिओ, प्रश्न उत्तर बरोबरच महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा त्यासाठी
99018 47044 किवा 7264001247 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन इस्कॉन च्या वतीने करण्यात आले आहे