बेळगाव लाईव्ह :यापूर्वी दीड दिवसांच्या घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरते कुंड उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेबरोबरच अन्य शासकीय संस्थांकडून यंदा पाच व सात दिवसांच्या श्रीमूर्तींसाठी देखील फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यापूर्वी दरवर्षी महापालिकेकडून दीड दिवसांच्या घरगुती श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरते कुंड उपलब्ध करून दिले जात होते. मात्र यंदा पाच व सात दिवसांच्या श्रीमूर्ती विसर्जनासाठी महापालिका तसेच अन्य शासकीय संस्थांकडून फिरत्या विसर्जन कुंडांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यंदा पाच दिवसांच्या गणपतींसाठी 10 ठिकाणी तर सात दिवसांच्या श्रीमूर्तींसाठी 12 ठिकाणी फिरते विसर्जन कुंड उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी विसर्जन कुंडाचे वाहन एक तासासाठी उपलब्ध असेल. घरगुती श्री गणेश मूर्तींसाठी फिरत्या विसर्जन कुंडांची व्यवस्था खालील प्रमाणे असणार आहे.
पाचव्या दिवशी 23 सप्टेंबर रोजी -भाग्यनगर पाचवा क्रॉस दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत, पहिले रेल्वे गेट सायंकाळी 4:30 ते 5:30, जुना धारवाड रोड (धिकोजी हॉस्पिटल) सायंकाळी 6 ते 7, बसवेश्वर चौक खासबाग सायंकाळी 7:30 ते 8:30, सुभाष मार्केट हिंदवाडी रात्री 9 ते 10, विश्वेश्वरय्यानगर बस स्टॉप दुपारी 3 ते 4, रामलिंग खिंड गल्ली टिळक चौक सायंकाळी 4:30 ते 5:30, स्टेट बँक ऑफ म्हैसूर महांतेशनगर सायंकाळी 6 ते 7, बॉक्साईट रोड (डॉ. नागलोतीमठ यांचे निवासस्थान) सायंकाळी 7:30 ते 8:30, हनुमाननगर सर्कल रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. सातव्या दिवशी 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत भाग्यनगर पाचवा क्रॉस, पहिले रेल्वे गेट (गणेश चौक -टिळकवाडी),
जुना धारवाड रोड धाकोजी हॉस्पिटल जवळ, बसवेश्वर चौक खासबाग, सुभाष मार्केट हिंदवाडी, विश्वेश्वरय्यानगर बस स्टॉप, रामलिंग खिंड गल्ली टिळक चौक, कणबर्गी देवस्थान रोड, देवराज अर्स कॉलनी तलावाजवळ, हिंडलगा झोपडपट्टी निर्मूलन कार्यालयाजवळ, सह्याद्रीनगर येथील जलकुंभा जवळ आणि नाझर कॅम्प वडगाव