बेळगाव लाईव्ह:आगामी 19 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. शहरातील गणेश मंडळांना हेस्कॉम कडून वीज पुरवठा परवानगीसाठी उद्या शुक्रवार 8 रोजी पासून सिंगल विंडो अंतर्गत परवानगी दिली जाणार आहे.
बेळगाव शहरात 378 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत त्या सर्व गणेश मंडळांना शहर परिसरातील 8 पोलीस स्थानकात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्या सर्व पोलीस स्थानकात हेस्कॉमने कर्मचारी नियुक्त केले असून त्याच ठिकाणी सिंगल विंडो अंतर्गत गणेश मंडळांना विद्युत परवानगी दिली जाणार आहे.
विद्युत परवानगीसाठी शहरातील सर्व पोलीस स्थानकातून मिळालेल्या अर्जाना आगामी 8 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या काळात परवानगी दिली जाणार आहे. दररोज दुपारी 3 ते सायंकाळी 5:30 या वेळेत त्या भागातील पोलीस स्थानकात परवानगी दिली जाणार असून हेस्कॉमच्या वतीने एक कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत.
बेळगाव हेस्कॉमने मनपाला लिहिलेल्या पत्रात सदर सिंगल विंडो अंतर्गत मंडळांना वीज परवानगी देखील दिली जाणार आहे याची माहिती दिली आहे.
हेस्काम सी एस डी अधिकारी आश्विन शिंदे यांनी खडे बाजार माळ मारुती आणि ए पी एम सी या तीन पोलीस स्थानकात असे हेस्कॉमचे प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.
खडे बाजार पोलीस स्थानकात : विनायक कामकर ,एम आर एकबोटे मोबाईल: 8147202167,8861974855 वरिष्ठ अधिकारी कल्लापा गोकावी 9916298713
माळ मारुती पोलीस स्थानक : अक्षय मिटगार,फारुख चचडी मोबाईल : 7411772252,9916326616 वरिष्ठ अधिकारी विजय मिशी , मोबाईल :9845875131
एपीएमसी पोलीस स्थानक :विशाल बुळळी,एस एम खणाजी, मोबाईल : 74834778710, 8073204 658, वरिष्ठ अधिकारी राजू जुट्टी मोबाईल 8123850035
शुक्रवारी पासून सिंगल विंडो च्या माध्यमातून बेळगावातील गणेश मंडळांना मिळणार विद्युत परवानगी pic.twitter.com/3sIS8K4whV
— Belgaumlive (@belgaumlive) September 7, 2023