बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेने खरेदी केलेल्या सर्व नव्या वाहनांना जीपीएस उपकरण बसविण्याचे ठरविले असून येत्या शनिवारी होणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
बेळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गेल्या कांही वर्षात नव्या वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे त्यामध्ये ऑटो टिप्परची संख्या अधिक असून या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवलेले नाही.
त्यामुळे सदर वाहनांचा वापर कोठे? व किती होतो? याची नेमकी माहिती आरोग्य विभागाला मिळत नाही. त्यामुळे आता नव्याने खरेदी केलेल्या सर्वच वाहनांना जीपीएस उपकरण बसविण्यात येणार आहे.
मात्र तत्पूर्वी आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मंजूर होणे आवश्यक आहे. आरोग्य स्थायी समितीची बैठक येत्या शनिवारी 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.