Sunday, December 22, 2024

/

गोवावेस सर्कलवर टिप्परनी महिलेला चिरडलं

 belgaum

बेळगाव लाईव्ह: टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच ठार तर  दुचाकी स्वार महिलेचा पती जखमी झाल्याची घटना बेळगाव शहरातील गोवावेस सर्कल वर सोमवारी सायंकाळी पावणेआठच्या दरम्यान घडली आहे.

सायरा मेहमुद मच्छेकर वय 50 रा.मुस्लिम गल्ली अनगोळ असे या अपघातात मयत झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा वेस सिग्नल वरचं सायंकाळी 7: 50 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. सायरा आणि त्यांचे पती मेहमूद हे दोघेही दाम्पत्य बेळगाव शहरातून घरी परततेवेळी गोवा वेस सर्कल सिग्नल वर आले असता दुचाकीला टिप्परने धडक दिली त्यात सायरा या टिप्परच्या चाकाखाली आल्या त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मेहमूद हे किरकोळ जखमी झाले.

घटनास्थळी रहदारी दक्षिण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. अपघात स्थळी काही वेळी ट्रॅफिक जाम झाला होता.Accident goaves

गेल्या दोन दिवसात शहरात रस्ते अपघातात मयत झालेली ही दुसरी महिला आहे दोन दिवसापूर्वी उद्यमबाग येथे पाण्याच्या टँकरने वृध्द महिलेला चिरडले होते त्यानंतर सोमवारी सायंकाळी गोवा वेस सर्कल मध्ये टिप्परने महिलेला चिरडले आहे.

बेळगाव शहरात रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली असून अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करावी या मागणीला नेहमीच प्रशासना कडून वाटाण्याच्या अक्षता मिळत आहेत. रहदारी पोलिसांनी प्रशासनाने यावर विचार करून शहरात अवजड वाहनांना प्रवेश देऊ नये किंवा रहदारीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी ओव्हर ब्रिजीसची संख्या वाढवावी अशीही मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.