बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ बेलगाम (मेन) या संघटनेतर्फे गेल्या पंचवीस वर्षापासून गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट श्रीमूर्ती व उत्कृष्ट देखावा स्पर्धा यंदाही आयोजित करण्यात आल्या आहेत.
बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर या विभागासाठी स्वतंत्रपणे या स्पर्धा होणार असून दोन्ही विभागात दोन्ही स्पर्धांसाठी पहिले तीन क्रमांक काढण्यात येणार असून त्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत.
इच्छुकांनी आपल्या मंडळांचा अहवाल विजय आचमनी, आचमनी हार्डवेअर गणपत गल्ली बेळगाव ,फोन 9448147909, संजय पाटील, नंदिनी दूध डेअरी, केळकर बाग,फोन 9945945547 फॅशन कॉर्नर देशमुख रोड टिळकवाडी फोन 0831 4210888 किंवा
जायंट्स भवन, कपिलेश्वर रोड बेळगाव येथे रोज सायंकाळी सहा ते सात या वेळेत मदन बामणे यांना 94481 91266 या क्रमांकावर संपर्क साधून नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे