बेळगाव लाईव्ह : गणेश चतुर्थी रोजी म्हणजे मंगळवार 19 रोजी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे मात्र त्या अगोदर गुरुवारी पासूनच बेळगाव शहरात सार्वजनिक गणपतींचे आगमन सोहळे सुरू झाले आहेत.
बेळगाव शहरातील चव्हाट गल्लीतील गणपतीचा गुरुवारी जल्लोषात आगमन सोहळा पार पडला तर शुक्रवारी येळळूर रोड वडगांव याशिवाय कामत गल्ली खडक गल्ली आणि राजहंस गल्ली अनगोळ यांचे आगमन सोहळे रंगणार आहेत.
या अगोदर आगमन सोहळ्यांची संख्या खूप कमी होती मात्र अलीकडे आगमन सोहळे वाढलेले आहेत मंडळांना गणेश चतुर्थी दिवशी गणेश मूर्ती आणताना येणाऱ्या अडचणी, श्री मूर्ती आणण्यासाठी लांबचे पल्ले, याशिवाय मूर्ती आणण्यासाठी लागणारा वेळ आणि कार्यकर्त्यांना घरातील गणपती आणण्यासाठीसाठी इतर कामासाठी मिळणारा कमी वेळ यासाठी आगमन सोहळे अगोदरच आयोजित केले जात आहेत.
आगमन सोहळ्याच्या निमित्ताने एक गणपती बाप्पाच्या स्वागताचा वेगळा ट्रेंड बेळगाव बनू लागलेला आहे कार्यकर्ते अनेक प्रकारचे सोशल मीडियावर रिल्स बनवत आहेत व्हिडिओ बनवत आहेत गणपती बाप्पा च्या आगमनाचा स्वागत करत आहेत. अनेक मंडळांनी आगमना सोहळ्या वेळी बनवण्याच्या स्पर्धा देखील ठेवल्या आहेत त्यामुळे आगमन सोहळे लोकप्रिय होऊ लागले आहेत.
बेळगावचा राजाचे दर्शन, भाविकांच्या गर्दीत आगमन
यंदा गणेश चतुर्थीला वेगळाच रंग आला आहे. प्रत्येक मंडळातील गणेश मुर्ती किती उंच आणि कोणत्या स्वरूपात असते, तेथील मंडपातील सजावट कशी असते हे पाहायला भाविकांची गर्दी होते. अशीच गर्दी गुरुवारी बेळगावातील धर्मवीर संभाजीराजे चौकात गुरुवारी रात्री झाली जेव्हा बेळगावचा राजाचे ( चव्हाट गल्लीच्या गणपतीचे)आगमन शहरात झाले. तेव्हा बेळगावचा राजाची गणेश मुर्ती आणि मुर्ती पाहण्यासाठी झालेली ही भाविकाच्या गर्दीत मोठ्या दिमाखात पार पडला.
सीमाभागातील आराध्य दैवत मानले जाणाऱ्या श्री गणेशाच्या आगमनाची जयत तयारी सुरू झाली आहे. यावर्षी शहरातील मोठे मंडळे आपल्या लाडक्या श्री गणेशाच्या भव्य मूर्तीला घेऊन मंडळात स्थापित करण्यासाठी तयारीला लागले आहे. गणेश चतुर्थी निमित्त राज्यभर मोठ्या प्रमाणावर श्री गणेशाची स्थापना करण्यात येते. त्यातच शहरातही मोठ्या प्रमाणावर छोटी मोठी मंडळी आहेत.
श्री ची स्थापना करण्यासाठी अवघे चार दिवस राहिले असताना मोठ्या मुर्त्या शहरात येण्यास सुरुवात झाली आहे. 19 सप्टेंबर रोजी उद्यमबाग रोड वरून बेळगावचा राजा या मूर्तीला नेण्यात आले. त्यावेळी मंडळाचे सदस्य तसेच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे ते आकर्षणाचे केंद्र बनले होते. बेळगावच्या राजाचे पूजन व मूर्तिकार आहेर पंच प्रताप मोहिते यांनी केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनील जाधव,उत्तम नाकाडी,विनायक पवार सरचिटणीस आनंद आपटेकर, सत्यम नाईक, उपाध्यक्ष जोतिबा पवार, निशांत कुडे, वृषभ मोहिते, किसन रेडेकर, विशाल मुचंडी, संदीप मोहिते, सुधीर धामणेकर, रोहन जाधव लक्ष्मण किल्लेकर,महिंद्र पवार विशाल गुंडकल सौरभ बामणे, निलेश गुंडकल,प्रभाकर गुंडकल जोतिबा किल्लेकर, निखिल पाटील, आकाश कुकडोळकर ,पवन किल्लेकर, जोतिबा नाईक,अनंत हांगीरगेकर, प्रियेश गौडडकर,यासह गल्लीतील मोठ्या संख्येने उपस्थित होते