Wednesday, November 20, 2024

/

बेळगावात बिबट्या लांडग्यांचा वावर का वाढला?

 belgaum

बेळगाव लाईव्ह ( मिश्किली):जंगलात लबाड प्राणी कोणता तर… तो कोल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जातो. त्या कोल्ह्याच्या फेऱ्या सध्या बेळगाव शहर व परिसरात वाढल्या आहेत. ‘ राजकारणी’ लबाड कोल्ह्यांच्या भेटीला हे जंगली लांडगे शहरात मानवीवस्तीत येतात का ?अशी चर्चा बेळगावात सध्या सुरू आहे.

एकंदर बेळगावच्या राजकारणात लबाडीचा माहोल जोरात असताना हे जंगली लबाड प्राणी बेळगाव शहरात येऊन कुणाशी खलबते करतात? असा मिश्किल सवाल बेळगावच्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बेळगाव शहराच्या आजूबाजूला असणारी जंगलं अजूनही घनदाट आहेत ,परंतु वॅक्सिंन डेपो मधले जंगल तोडणाऱ्या काही महाभागानी पशुपक्ष्यांचा अधिवास नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना जाब विचारण्यासाठी हे लांडगे शहरात घुसत आहेत की काय ?असा एक आगळावेगळा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मागील वर्षी रेस कोर्स मैदानावर कित्येक आठवडे बिबट्या ठाण मांडून बसला होता . बिबट्या देखील जंगलातील लबाड प्राणीच आहे .बिबट्यामुळे त्या काळात बेळगाव परिसरातील शाळांना देखील सुट्ट्यां देण्यात आल्या होत्या. चाळीस लाख प्रशासनाने खर्च केले मात्र बिबट्या पसार झाला. त्यानंतर गेल्या आठ दिवसापूर्वी एक लांडगा शास्त्रीनगर भागात आला होता आणि त्या लांडग्याने एकाला जखमी केले. एक आठवडा संपतो न संपतो तोच दुसरा लांडगा शिवाजीनगर भागात आला आणि त्याने दोघा जणांना जखमी केलं.Leapard fox

राजकर्त्यांच्या साठमारीत हैरान झालेले बेळगावचे नागरिक या जंगली लांडग्यांच्या आगमनाने हवालदील झाले आहेत. त्याचबरोबर दहशतीच्या वातावरणात देखील आहेत. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात व्हावा म्हणून गेली 66 वर्षे आंदोलन करणाऱ्या मराठी माणसाच्या जखमा अजून ताज्या आहेत या जखमांचा जाब विचारण्यासाठी ढाण्या वाघाची अजून गर्जना चालू झाली नाही म्हणून बेळगावात येत आहेत अशीही वंदता चालू आहे.

माणसाच्या जमिनी बळकावणाऱ्या लबाड लांडग्याशी हितगुज साधण्यासाठीच बहुतेक जंगली लांडगे येत असावेत असा काहीचा होरा आहे. बेळगाव शहराच्या आजूबाजूच्या जमिनी लाटाव्यात त्याच्यावर प्लॉटिंग करावा शेतकऱ्यांना देशोधडीला लावावा त्यांच्या गरिबीचा फायदा घ्यावा अशा पद्धतीचे राजकर्ते बेळगावत माजलेले आहेत त्यामुळे जे जंगलात लबाड म्हणून ओळखले जातात ते यांचे भाऊबंद याना भेटण्यासाठी येत असावेत असा काहीसा तर्क लढवला जात आहे .तरी स्वतःत सुधारणा करून घेतली नाही तर एक दिवस जंगलाचा राजा ढाण्या वाघ तुमच्या समाचारला येईल अशी आशा काही शेतकरी व्यक्त करत आहेत. तरी यांना आता तरी सुधरा रे अशी म्हणण्याची वेळ आली आहे

अस्विकरण (Disclaimer): या बातमीशी संबंधित कुणाशीही साधर्म्य आढळल्यास तो फक्त आणि फक्त निव्वळ योगायोग समजला जाईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.