बेळगाव लाईव्ह:हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची शहरी बस पलटी झाल्यामुळे बस वाहकासह दोघेजण गंभीर जखमी तर अन्य 3 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली.
अपघातातील जखमींची नावे सहाना हनुमंत चव्हाटगी (वय 16), शोभा सिद्राय गाणगी (वय 24), गंगाव्वा चंद्राप्पा हंचिनमनी (वय 35), रायाप्पा सन्नाप्पा बडस (वय 46) आणि राजश्री संतोष दानरेकर अशी आहेत.
यापैकी शोभा गानगी आणि रायप्पा बडस हे अनुक्रमे बसचे वाहक व चालक आहेत. त्याचप्रमाणे जखमींपैकी सहाना चव्हाटगी ही विद्यार्थिनी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बसमधून 10 प्रवासी प्रवास करत होते. गंभीर जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.