Friday, November 15, 2024

/

अनोख्या पद्धतीने मंगळा गौर कार्यक्रमाचे आयोजन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहापूर बेळगाव येथे मंगळागौरी पूजन आणि गणेशोत्सव चा विविध कार्यक्रमाने ग्रंथ हेच गुरु आणि वाचनाचे महत्त्व वाचाल तर वाचाल अशा आशयाला धरून मंगळागौरी पूजन करण्यात आले.अखिल भारतीय प्रगतीशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगाव यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विविध भाषांमधील विविध प्रकारचे पुस्तके आणि त्याच्या आतील मजकूर ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे असं सांगणारा विषय या ठिकाणी आहे विविध आसनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यावेळी विविध फुलांनी सजवलेला गणेशोत्सव चा मंडप आणि त्या ठिकाणी असलेले आरास तसेच विविध फराळ संत ज्ञानेश्वरी तुकोबा ज्ञानोबा यांनी लिहिलेली अतिशय महत्त्वाचे ग्रंथ ठेवून ग्रंथांचे महत्त्व वाचनाचे महत्त्व आणि ज्ञानाचे महत्त्व पटवून देणारे आरास या ठिकाणी करण्यात आले होते. विशेष वेगळ्या अनोख्या पद्धतीने घरच्या गणपती उत्सवामध्ये विशेष आरास करून सगळ्यांचे गणेश उत्सव भक्तांचे मन वेधून घेतलेले आहे. कथा कादंबरी नाटक प्रवास वर्णन ललित कथा स्पोर्ट लेखन धर्मग्रंथ वांग्मय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक उद्योग कला क्रीडा साहित्य ग्रामीण साहित्य लोकसाहित्य धर्मशास्त्र संत ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा एकनाथी भागवत आणि आधुनिक कथा कविता यांच्यासह साहित्याची मेजवानी साहित्यातून नवा उत्कर्ष कसा सांगता येईल.

शहापूर बेळगांव येथील अंजली गोडसे, अंजली शिर्के, स्मिता शिंदे, पी. एस.पाटील, शिल्पा बोगरे, वर्षा चव्हाण, शोभा देगनोळी, निता पाटील, निता डौलतकर, वनिता सायानेकर, अरुणा कोळी, मेघा जाधव, ज्योती गवी, प्रतिभा माळगी, अनिता आचरेकर, रेखा शिंदे, कुमुद शहाकर, आर व्ही. पाटील, प्रणिता खरात, गायत्री शिंदे, उज्वला पाटील, रेश्मा हुंद्रे यासह वेगवेगळ्या ठिकाणी सादर केलेला कला सांस्कृतिक कार्यक्रम लोककला आणि मंगळागौरीच्या विविध गीतांचे सादरीकरण करण्यात आले.Mangla gour

आधुनिक काळामध्ये दिवसेंदिवस बदलत जाणारी रिती रिवाज परंपरा आणि नव्या योजना.
धावपळीच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक ठिकाणी स्पर्धा चालू आहे या वेळेला अभ्यासाच्या क्षेत्र पाहिलं तर वाचन संस्कृती कुठेतरी लोक पावत चाललेली आहे असं आपल्याला वाटते आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणकीच्या माध्यमातून होणारे वाचन संस्कृती कमी होताना हळूहळू दिसत आहे वाचनालय ऊस पडताना दिसत आहेत पण नव्या पिढीमध्ये संदेश देण्यासाठी गणेश चतुर्थीच्या गौरी गणपती उत्सवामध्ये एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

त्यावेळी व्हाट्सअप फेसबुक इंटरनेट इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आणि हळुवार पद्धतीने नव्या पिढीमध्ये वाचन संस्कृती कमी होताना दिसते आहे त्याची उणीव भरून काढण्यासाठी एक सामाजिक शैक्षणिक साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी हा नवा उपक्रम गौरी गणपतीच्या उत्सवामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे बेळगाव येथील शहापूर या ठिकाणी एक अनोख्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला आहे त्यामुळे सर्वत्र या कुटुंबांचा अभिनंदन करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.