बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सवानिमित्त बेळगाव शहरात जिल्हा पोलीस प्रमुख श्रेणीच्या पाच अधिकाऱ्यांसह सुमारे 1800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यामध्ये विविध राखीव दलातील तुकड्यांचा समावेश आहे.
श्री गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून 11 दिवसाचा हा सोहळा शांततेने सुरळीत पार पडावा. यासाठी शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बाजारपेठेसह गर्दीच्या ठिकाणी आणि विशेष करून संवेदनशील भागात ज्यादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.
याखेरीज रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेशोत्सव सुरळीत व्हावा या उद्देशाने संवेदनशील व अत्यावश्यक असलेल्या मंडपात सीसीटीव्ही बसवण्याची सक्ती पोलिसांनी केली आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सध्या शहरात तैनात पोलीस बंदोबस्तामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख श्रेणीचे 5 अधिकारी, 15 एसीपी, 20 पोलीस निरीक्षक याचबरोबर पीएसआय, पोलिसांसह केएसआयपी व सीआरपीएफच्या 13 तुकड्यांचा समावेश आहे.