Sunday, December 22, 2024

/

जिल्ह्यात विमानाद्वारे ढग पेरणीच्या कामाचा झाला शुभारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पावसा अभावी निर्माण झालेली सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी बेळगाव शुगर प्रायव्हेट लिमिटेडने ढग पेरणीसाठी (क्लाऊड शोविंग) पहिले पाऊल उचलले असून जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज ढग पेरणीच्या कामाला चालना दिली.

बेळगाव विमानतळावर आज शुक्रवारी सकाळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ढग पेरणीच्या कामाचे ध्वज दाखवून उद्घाटन करण्यात आले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी ढग पेरणीच्या या उपक्रमाला हिरवा कंदील दाखवला आहे.

पावसासाठी बेळगाव जिल्ह्यात आज दि. 29 आणि उद्या शनिवारी दि. 30 सप्टेंबर रोजी ढग पेरणीचे काम केले जाईल. कॅप्टन वीरेंद्र सिंग आणि कॅप्टन आदर्श पांडे हे उभयता व्हीटी -केसीएम विमानाद्वारे जिल्ह्यात ढग पेरणी करतील. कमी उंचावर ढग निर्माण करण्यासाठी विमानाद्वारे सीएसीएल -2 केमिकल फवारणी आणि 20 हजार फुटावर सिल्व्हर आयोडाइड केमिकल्सची फवारणी केली जाईल.Cloud seeding

जर एखाद्या भागात ढग असतील तर केमिकल फवारणी केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात त्या ठिकाणी पाऊस पडेल, असे ढग पेरणी करणाऱ्या तंत्रज्ञांनी सांगितले. सध्या बेळगावच्या आकाशात ढग आढळून येत असल्यामुळे हे वातावरण ढग पेरणीसाठी पोषक असल्याचे सांगण्यात आले. विमानाद्वारे आकाशात फवारणी करण्यात येणारे सिल्व्हर बायोडाइड केमिकल्स 5 ते 10 हजार फुटावरील आकाशातील ढगांना आकर्षित करते, असेही उपक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ढग पेरणीच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या समवेत आमदार असिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवा नेते राहुल जारकीहोळी आणि इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.