करंट लागून जखमी झालेल्या बालकाला मदतीचे आवाहन

0
13
Help electricity
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गणेश उत्सव काळात चार दिवसांपूर्वी प्रथमेश पिराजी कंग्राळकर (वय 13) रा. वडगाव  हा बालक करंट लागून जखमी झाला आहे.

सध्या त्याच्यावर  बेळगाव येथील के एल ई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला आर्थिक मदतीची गरज लागणार आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून सामाजिक जाणीव ठेऊन प्रथमेशला मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.Help electricity

 belgaum

ज्या गणेश मंडळांना किंवा आणखी कुणाला मदत करायची असेल त्यांनी त्यांनी मोहन कोणेरी मो. क्र. 6363830720 किंवा बाळू चापगावकर मो. क्र. 9164071745 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.

लोकमान्य गणेश मंडळ पाटील गल्ली वडगाव या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत प्रथमेशच्या उपचारासाठी 30 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. इतर मंडळांनीही या बालकाच्या उपचारास मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.