Wednesday, November 20, 2024

/

बोकनूरची किरण बीएसएफमध्ये होणार रुजू

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शेताला कसं कुंपण घालावं ही शेतकऱ्याची कला व गरज असते.अहोरात्र कष्ट करून पिकवलेले पीक सुरक्षित राखणे ही शेतकऱ्याची निकड असते.अनेक क्रांतीकारकानी हौतात्म्य पत्करून मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सीमा सुरक्षित गरजेचे असते हे शेतकऱ्या इतके कुणाला कळणार? म्हणूनच बोकनुरची मातीशी नातं सांगणारी शेतकऱ्याची लेक देशाच्या सीमा रक्षणासाठी निघाली आहे हा केवळ योगायोग नसून पिढ्यान् पिढ्या रक्तात भिनलेली आपल्या मातृभूमी प्रतीची निष्ठा आहे.

बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील बोकनूर गावची सुकन्या कु. किरण कृष्णा पाटील हीची भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) निवड झाली असून पुढील महिन्यात ती पश्चिम बंगाल येथील बीएसएफच्या प्रशिक्षण केंद्रात रुजू होणार आहे. या पद्धतीने बोकनूर गावासह त्या परिसरातून बीएसएफमध्ये निवड झालेली किरण ही पहिलीच युवती आहे हे विशेष होय.

बोकनुर येथील प्रगतशील शेतकरी कृष्णा पाटील यांची सुकन्या असलेल्या किरण पाटील हिचे प्राथमिक शिक्षण तुडये येथील सातेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तर माध्यमिक शिक्षण कार्वे (ता. चंदगड जि. कोल्हापूर) येथील महात्मा फुले विद्यालयामध्ये झाले आहे. बेळगावच्या ज्योती कॉलेजमध्ये पदवी पूर्व शिक्षण घेतलेल्या किरणने भाऊराव काकतकर कॉलेजमधून वाणिज्य शाखेची बी.कॉम. ही पदवी संपादन केली आहे.

कॉलेजमध्ये म्हणजे बारावीत शिकत असताना म्हणजे 2018 पासून किरणच्या मनात पोलीस दलात महिला पोलीस म्हणून भरती होण्याची इच्छा निर्माण झाली. त्या दृष्टीने तिने आपले प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र त्यामध्ये यश येत नसल्यामुळे तिने सीमा सुरक्षा दलात भरती होण्याचा निश्चय केला. त्या अनुषंगाने धावणे वगैरे शारीरिक व्यायाम वगैरे मेहनत घेण्यास सुरुवात केली. याबरोबरच शनिवार खुट बेळगाव येथील कर्नाटक कोचिंग क्लासेस सेंटर येथे तीन महिन्यासाठी मार्गदर्शन घेतले.Kiran patil

त्यानंतर अलीकडेच 2022 -23 सालासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत निमलष्करी दलांसाठी घेण्यात आलेल्या निवड चांचणीमध्ये तिने भाग घेत आपल्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आणि तिची सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) निवड झाली. त्यामुळे आता किरण प्रशिक्षणासाठी येत्या 27 ऑक्टोबर 2023 रोजी पश्चिम बंगालमध्ये असलेल्या बैकुंठापूर कॅम्प येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात रुजू होणार आहे.

या पद्धतीने बीएसएफमध्ये भरती होणारी किरण कृष्णा पाटील ही बोकनुर परिसरातील पहिलीच युवती आहे. तिच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे. आपल्या या यशाचे श्रेय किरण आपले वडील कृष्णा पाटील, आई राधिका, आजी लक्ष्मी, काका राजाराम, काकी दीपा, बहिण सुजणी, श्रुती, कोमल, काजल, भाऊ श्रीराम, समर्थ आणि विनायक यांना देते.

या सर्वांच्या प्रोत्साहन व पाठिंबामुळेच मी बीएसएफमध्ये भरती होण्याद्वारे आपले ध्येय गाठू शकले असे किरणने बेळगाव लाईव्हशी बोलताना आवर्जून सांगितले. आमच्या रणरागिनीच्या हातात देशाच्या सीमा सुरक्षित राहणार आहेत.त्यांनी आखलेली लक्ष्मण रेषा ओलांडण्याचे साहस शत्रूला होणार नाही यात काहीच तिळमात्र शंका नाही.
ज्या घरातील युवती, साहसी, जिद्दी ,मेहनती आहेत
अश्या धाडसी मुलींची यशोगाथा ‘बेळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून समाजापुढे आदर्श म्हणून ठेवणे एक सदृढ वृत्त वाहिनीचे कर्तव्य आहे अश्या बेळगावच्या लेकीना टीम बेळगाव Live कडून शुभेच्छा!

 

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.