Monday, December 23, 2024

/

भीमा शंकर गुळेद बेळगावचे नवे एस.पी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून ज्येष्ठ पोलीस अधिकारी भीमाशंकर गुळेद यांनी आज पदभार स्वीकारला.

भीमाशंकर गुळेद यांनी बेळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून आज पदभार स्वीकारला. मावळते एसपी डॉ. संजीव पाटील यांनी पदभार सोपवला.

प्रसामाध्यमांशी बोलताना नूतन पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचा एस पी म्हणून आज मी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.Guled sp

बेळगाव जिल्ह्यातील गुंडगिरी, अवैध कारवाया मोडून काढून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एसपी डॉ. संजीव पाटील यांनी खूप चांगले काम केले असून त्यांचे काम मी यापुढेही चालू ठेवणार आहे असे त्यांनी सांगितले.पोलिसांचे सहकार्य बेळगाव जिल्ह्यातील जनतेला मिळेल असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.