बेळगाव लाईव्ह : बेळगाव लाईव्हचा सामाजिक भान राखणारा कार्यक्रम नरगुंदकर भावे चौकातील सार्वजनिक गणेश मंडपात मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील विविध घटकांचा त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्याच बरोबर क्रीडा पटूनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरी बद्दल त्याच बरोबर देशाच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी निवड झालेल्या मुलींचाही सत्कार सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून करण्यात आला.
समाजातील विविध घटकांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
नरगुंदकर भावे चौक गणेश मंडळाचे सचिव राजेंद्र हंडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार मराठा मंदिर चे अध्यक्ष उद्योजक आप्पासाहेब गुरव ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील आणि मध्यवर्ती गणेश महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी होते. सुरुवातीला बेळगाव लाईव्ह संपादक प्रकाश बेळगोजी यांनी प्रास्ताविक करून उपस्थित त्यांचे स्वागत केले.
बेळगाव यांच्या वतीने विधायक गणेश उत्सव साजरा करणाऱ्या दोन गणेश मंडळाचा प्रातिनिधिक स्वरूप म्हणून सत्कार केला बेळगाव उत्तर भागातून 111 व्या वर्षात पदार्पण करणारे गणेश मंडळ, ज्या मंडळाने रक्तदान शिबिर भरवत सामाजिक बांधिलकी जपत यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात केली होती त्या कामत गल्लीच्या गणेश मंडळाला आणि जुने बेळगाव येथील नरवीर व्यायाम शाळा गणेश मंडळ ज्या युवकांनी व्यसनमुक्तीचा ध्यास घेतला आहे त्यांनी राबवलेले विधायक उपक्रम युवकांना व्यसन मुक्ती कडे नेत आहेत आणि युवकांना व्यायामाकडे वळा संदेश देत आहेत, यासाठी या दोन मंडळांना विधायक गणेश मंडळ म्हणून गौरविण्यात आले.
यावेळी गेल्या वर्षभरामध्ये समाजातील विविध क्षेत्रात काम केलेल्या समाजसेवकांचा देखील सत्कार करण्यात आला त्यात संतोष दरेकर फेसबुक फ्रेंड सर्कल, रामा पाटील सर्पमित्र याशिवाय पर्यावरण आणि व्हॅक्सिन डेपो बचाव आंदोलनातले कार्यकर्ते आणि मुक्या प्राण्यांसाठी काम करत असलेले बी एस एन नेटवर्क चे वरून कारखानीस, सदाशिव नगर नेहरू नगर भागातील समाजसेवक प्रसाद चौगुले, गोरक्षक श्रीराम सेना हिंदुस्तानचे नारू निलजकर यासह एस जी आर्मी कोचिंग अकादमीचे प्रशांत शहापूरकर ज्यांनी अनेकाका नोकऱ्या उपलब्ध देण्यात पुढाकार घेतलेला आहे यांनाही गौरविण्यात आले. सीमाभागातील युवक अभियंता असलेले अमित देसाई यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस इंजिनिअर सेलच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यासाठी देसाई यांचा सन्मान झाला.
खेळात यंदाच्या वर्षात बेळगाव शहराचे नाव उज्वल केलेले खेलो इंडिया सीनियर वेटलिफ्टिंग सुवर्णपदक विजेते हलगा गावची कन्या अक्षता कामती आणि सध्या सीआयएफ मध्ये कार्यरत असलेल्या आफ्रिकेत झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल मिळवलेले पूजा शहापूरकर यांचा देखील सन्मान करण्यात आला.
याशिवाय भारतीय संरक्षण दलात निवड झालेल्या बेळगाव तालुक्यातील चारी लेकिंचा सत्कार करण्यात आला. त्यात सीमा सुरक्षा दल अर्थात बी एस एफ भावना गोंडाडकर ( जाफरवाडी) पूजा परीट ( संती बस्तवाड) आणि किरण पाटील (बोकणुर) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफ मध्ये रुजू झालेल्या पिरनवाडी येथील अश्विनी पाटील यांचा सत्कार करून त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
घरगुती देखाव्यातून विधायकता जपणाऱ्या, हालते देखावा घरघुती देखाव्याना देखील स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज जाधव यांनी केले. यावेळी गणेश भक्त बाळ गोपाळ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.