बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील बोकनूर येथील एससी-एसटी कॉलनीतील आठवड्यापूर्वी केलेल्या काँक्रीटच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले होते त्याची बातमी बेळगाव live ने प्रसिद्ध करताच त्या कॉन्ट्रॅक्टरचे डोळे उघडले असून तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे आहे.
बोकनूर येथील एससी-एसटी कॉलनीमधील रस्त्यांचे आठवड्यापूर्वी कॉंक्रिटीकरण करण्यात आले होते मात्र हे कॉंक्रिटीकरण इतके निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे की फावडा वगैरेने नुसते खरवडले तरी रस्त्याचे काँक्रीट उखडत होते.
कॉंक्रिटीकरण करताना त्यामध्ये सिमेंटचा पुरेसा वापर करण्यात आला नसल्यामुळे सदर रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्याबरोबरच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या त्याची दखल बेळगाव लाईव्ह घेतली होती आणि ‘रस्त्याची निघते खपली आणि कोण करणार मलमपट्टी ‘ या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते त्या वृत्ताची प्रशासकीय यंत्रणेने आणि ठेकेदाराने घेत रस्ता दुरुस्ती कामाला तत्काळ सुरुवात केली आहे. बेळगाव लाईव्ह ने केलेल्या मूलभूत सामाजिक समस्यांच्या प्रत्येक बातमीची दखल घेतली जात असल्याने पुन्हा एकदा बेळगाव live एक सक्षम सदृश माध्यम म्हणून पुढे येत आहे.
बेळगावातील ग्राम पंचायती अंतर्गत होणारी कामे त्याच्या दर्जाच्या बाबतीत उत्कृष्ट असावीत यासाठी ग्राम पंचायत सदस्यांनी आग्रही असायला हवे आपल्या जबाबदारीवर ठाम राहत त्यांनी कामाच्या एकंदर दर्जाच्या बाबतीत पाहणी करायला हवी.
ग्राम पंचायत सदस्यांच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या सर्व कामांवर सतर्क असले पाहिजेत तरच ग्राम विकास साधला जाणार आहे नाही तर ग्रामस्थांचे जगणे असय्य होईल.
कमिशन राजच्या या जमान्यात निकृष्ट कामे होत असताना नागरिकांनी जागरूकतेने होणाऱ्या कामावर लक्ष दिले पाहिजे.