बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत् संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे.
इस्कॉनच्या शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात काल व आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिर आणि मंदिर परिसरात फुलांची संपूर्ण सजावट करण्यात आली असून वातावरण अतिशय प्रसन्न बनले आहे.
गुरुवार दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून दिवसभर भजन ,कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. आज सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजेपर्यंत भक्तांचे आणि त्यानंतर रात्री नऊ पर्यंत देणगीदारांचे अभिषेक होणार आहेत.
रात्री परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराजांचे विशेष कथाकथन होणार असून त्यानंतर गौर आरती व नृसिंह आरती होईल मध्यरात्रीच्या जन्मोत्सवानंतर सर्वांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे
श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त बेळगावातील इस्कॉन मंदिरातील दृश्ये | Belgaum Live – बेळगाव लाईव्ह b pic.twitter.com/7Mwr53CLbc
— Belgaumlive (@belgaumlive) September 7, 2023