बेळगाव लाईव्ह :प्रवाशांच्या वाढत्या मागणीवरून नैऋत्य रेल्वेने गणेशोत्सव काळात यशवंतपुर -बेळगाव ही विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांच्या सोयीसाठी या रेल्वेच्या दोन फेऱ्या होणार आहेत.
गणेशोत्सव काळात खाजगी बसेसना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बेळगाव शहर परिसरातील अनेक नागरिक कामानिमित्त पुणे, मुंबई, बेंगलोर आदी शहरांमध्ये राहतात. सणासुदीच्या काळात ते बेळगावला येत असल्यामुळे विशेष रेल्वेची मागणी केली जात होती. त्याची दखल घेत नैऋत्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी यशवंतपुर -बेळगाव ही विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यशवंतपुर -बेळगाव एक्सप्रेस रेल्वे (क्र. 07389 व 07391) शुक्रवारी 15 रोजी व रविवारी 17 रोजी धावणार आहे.
यशवंतपुर येथून सायंकाळी 6:15 वाजता निघालेली ही एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता बेळगावला पोहोचेल. तर बेळगाव -यशवंतपुर एक्सप्रेस (क्र. 07390 व 07392) शनिवारी 16 रोजी व सोमवारी 18 रोजी धावेल.
ही रेल्वे बेळगाव येथून सायंकाळी 5:30 वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजता यशवंतपुर -बेंगलोरला पोहोचेल. या एक्सप्रेसला 18 डबे जोडण्यात आले असून सदर विशेष रेल्वेसाठी बुकिंग सुरू झाले आहे.