बेळगाव लाईव्ह: कोणत्याही खेळाडूंचे जर कौतुक केले त्यांना प्रोत्साहन दिले तर त्यांचे कौशल्य नक्कीच वाढते यासाठी खेळात यशस्वी झालेल्यांना सगळेच प्रोत्साहन देत असतात आंतर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग दर्धवलेल्या विद्यार्थिनींचे जंगी स्वागत बेळगाव शहरातल्या डीपी शाळेने केले.
बँकॉक येथे झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून आपल्या डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलचे नांव उज्वल करणाऱ्या टे. टे. खेळाडू तनिष्का काळभैरव आणि आयुषी यांचे आज शनिवारी सकाळी शाळेतर्फे भव्य रोड शो अर्थात मिरवणुकीद्वारे जंगी स्वागत करण्यात आले.
टिळकवाडी येथील डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलच्या (डीपी) विद्यार्थिनी तनिष्का काळभैरव आणि आयुषी या दोघी चांगल्या होतकरू टेबल टेनिसपटू आहेत. सातत्याने चमकदार कामगिरी नोंदवणाऱ्या या दोघींनी बँकॉक येथे नुकत्याच झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत आपल्या शाळेसह देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
या पद्धतीने आपल्या शाळेचे नांव विश्वस्तरावर चमकविल्याबद्दल तनिष्का व आयुष्य या दोघींचे डिव्हाईन प्रॉव्हिडन्स शाळेतर्फे आज शनिवारी सकाळी पहिल्या रेल्वे गेटपासून शाळेपर्यंत त्यांची भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. या रोड शोमध्ये शाळेच्या विद्यार्थिनींसह पालक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर शाळेतर्फे दोन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
जागतिक स्तरावर धडक मारणाऱ्या आयुषी हिने वयाच्या 6 व्या वर्षीच बेळगाव टेबल टेनिस अकॅडमीमध्ये नामवंत टेबल टेनिस प्रशिक्षक संगम बैलूर यांच्या मार्गदर्शनाखाली टेबल टेनिसचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. पुढे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी तिने टेबल टेनिस मधील 13 वर्षाखालील राज्य मानांकनामध्ये प्रथम स्थान पटकाविले. त्यानंतर सलग दोन वर्षे आयुषीने हे प्रथम मानांकन स्वतःकडेच अबाधित ठेवले होते.
राष्ट्रीय पातळीवरील टेबल टेनिस स्पर्धांमध्ये तिने अनेकदा कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या आयुषीला 13 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये अखिल भारतीय पातळीवर 13 वे मानांकन प्राप्त आहे. आतापर्यंत तालुका आणि जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धांमध्ये तिने असंख्य बक्षिसे मिळवली आहेत. आता तिने आपली सहकारी तनिष्का काळभैरव हिच्या साथीने थायलंड बँक ऑफ येथे झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेऊन स्वतःच्या शाळेसह बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने पीएसपीबी आयुषीची निवड केली असून तिच्या टेबल टेनिस प्रशिक्षणासह शिक्षण तसेच भविष्यात योग्य नोकरी याची जबाबदारी पीएसपीबीने उचलली आहे हे विशेष होय.
https://x.com/belgaumlive/status/1702973708149686500?s=20