बेळगाव लाईव्ह :अनुसूचित जाती -जमाती अर्थात मागासवर्गीयांवरील अत्याचार नियंत्रणासाठी नियुक्त जिल्हा पातळीवरील जागृती प्रभारी समितीच्या सदस्यपदी भाग्यनगर, अनगोळ येथील विजय (यल्लाप्पा) बसप्पा तळवार यांची दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागासवर्गीयांवरील अत्याचार नियंत्रणासाठी नियुक्त जिल्हा पातळीवरील जागृती प्रभारी समितीवर सरकारी अधिकारी वगळता नियुक्त केलेल्या सदस्यांची नावे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहेत.
समितीमध्ये विजय तळवार यांच्यासह जीवन अशोक मांजरेकर (रा. इंदिरानगर, ता. चिक्कोडी), करेप्पा अर्जुन गुंडन्नावर (रा. बसापूर ता. हुक्केरी), सिद्राई सिद्धप्पा मेत्री (रा. घटप्रभा ता. गोकाक) आणि बसप्पा तळवार (रा. तारीहाळ ता. बेळगाव) यांचा समावेश आहे.
आपल्या निवडीबद्दल विजय तळवार यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे आभार मानले आहेत.
मागासवर्गीयावर अन्याय होऊ नये हे आपले ध्येय आहे ते करत असताना इतरांवर देखील अन्याय होऊ नये. घटनेनुसार न्याय मिळावा अशी आपली भूमिका आहे. मागास वर्गीया वर होणारे अन्याय दूर व्हावेत त्यासाठीच कार्यरत राहू असे तलवार यांनी म्हटले आहे.