Saturday, December 21, 2024

/

खानापूर समितीचे पालक मंत्र्यांना साकडे

 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करून त्यांचे नजीकच्या शाळेमध्ये विलीनीकरण करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जावा. तसा निर्णय कृपया घेतला जाऊ नये, अशी विनंती खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त विनंतीचे निवेदन आज मंगळवारी जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांना सादर करण्यात आले. खानापूर तालुक्यातील ज्या शाळांची एकूण पटसंख्या 15 पेक्षा कमी आहे अशा शाळा बंद करून त्यांचे नजीक अस्तित्वात असलेल्या अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये विलनीकरण करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला असल्याचे प्रसिद्धी माध्यमांकडून कळते.

आमचा तालुका मलनाड आणि डोंगराळ प्रदेशात वसलेला आहे भौगोलिक दृष्ट्या आमचा तालुका आकाराने मोठा असून तालुक्यातील गाव जंगलामध्ये विखुरली आहेत. ज्या ठिकाणी वाहतुकीची देखील सोय नाही, शिवाय वन्य प्राण्यांचीही भीती आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेला जाणे कठीण जात असते. ही एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन अस्तित्वात असलेल्या शाळा बंद करून त्यांचे विलनीकरण करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जावा आणि संबंधित मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले जावे अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष देसाई यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, माजी आमदार दिगंबर पाटील व अन्य पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

बेळगाव खानापूर दुष्काळ ग्रस्त घोषित करा

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यावर कृत्रिम पाऊस पाडवा आणि खानापूर तालुक्याला दुष्काळग्रही तालुका घोषित करा अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली.

यावर्षी पावसाळ्यात महत्वाच्या वेळेला पावसाने दांडी दिल्याने,शेतकऱ्याची पीक वाळू लागली आहेत ,आता सर्वसाधारण 50% पीक वांळून गेली आहेत शिल्लक पीक टिकवण्यासाठी तरी कृत्रिम पाऊसच प्रयोग जिल्ह्यावर करावा अशी विनंती ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी पालकमंत्री जारकी होळी यांच्याकडे केली आहे.

खानापूर तालुकयातील घे दुष्काळाचा आढावा देताना प्रसाद पाटील यांनी खानापूर बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुक्याच्या सुचीतून बाहेर आहेत पण या दोन्ही तालुक्यात पूर्ण दुष्काळ परिस्थिती आहे .त्यासाठी दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत अशी मागणी केली.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील,परशराम जाधव ,विवेक तडकोड, भरतेश तोरोजी,महावीर पाटील आणि इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.