बेळगाव लाईव्ह :तुर्केवाडी ता. चंदगड येथील पंढरीची पायी वारी करणाऱ्या 38 वारकरी मंडळींनी आज जीवनातील पहिला विमान प्रवास केला. हा प्रवास करून गोवा येथील मोपा विमानतळ ते वाराणसी असा पल्ला गाठला असून ते अयोध्या, प्रयागराज आणि चित्रकूट आदी ठिकाणांचे दर्शन घेणार आहेत.
बेळगाव येथील पृथ्वीराज टूर्स चे संचालक प्रसाद प्रभू यांनी त्यांच्या या प्रवासाची सोय केली आहे.
सहल संयोजक गोपाळ ओऊळकर आणि तूर्केवाडी गावचे सरपंच रुद्रप्पा तेली यांच्या नेतृत्वाखाली ही सहल आयोजित करण्यात आली आहे. बेळगावच्या नामवंत प्रतिक टूर्स चे मालक प्रतिक प्रेमानंद गुरव यांनी यामध्ये विशेष सहकार्य दिले आहे.
गावातील ब्रम्हलिंग मंदिरात पूजा अर्चा करून सहलीची सुरुवात करण्यात आली. बैलगाडी, बस किंवा रेल्वे पर्यंतचा प्रवास केलेले साथीदार प्रथमच विमान प्रवासाला निघाले असल्याने त्यांना निरोप देण्यासाठी अवघा गाव लोटला होता.
यावेळी सहलीचे नियम आणि घ्यावयाची काळजी याची माहिती देऊन सर्व सदस्यांना निरोप देण्यात आला.
एकूण सहा दिवसांची ही सहल असून परतीच्या प्रवासात वाराणसी ते गोवा असा पुन्हा विमानप्रवास करून हे वारकरी आपल्या गावी दाखल होणार आहेत.
शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला आणि सर्वसामान्य वर्गासाठी कमी खर्चात दर्जेदार सहली आयोजित करण्याचा वसा पृथ्वीराज टूर्स ने घेतला आहे. दरम्यान या वर्गातील व्यक्तींनी सहली आयोजित करण्यासाठी 96860 84656, 8748855575, 8073324496 या क्रमांकावर संपर्क साधावा.